शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय, सीआयडीला उच्च न्यायालयाने घेतले फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:17 IST

दाभोलकर, पानसरे हत्या; खटल्यास विलंब होत असल्याने व्यक्त केली चिंता

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्र्रकरणी खटला चालविण्यास विलंब होत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली. या विलंबामुळे न्यायदानामध्ये ‘अपयश’ येऊ नये, असे म्हणत उच्च न्यायालयाने सीबीआयसह सीआयडीलाही फैलावर घेतले.

दाभोलकर यांची हत्या होऊन सात वर्षे तर पानसरे यांची हत्या होऊन पाच वर्षे उलटली तरीही पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणा अद्याप फरार मारेकऱ्यांच्या शोधात आहे. तर, दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे शोधत आहेत, असे न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. आर.आय. छागला यांच्या खंडपीठाने उपरोधिकपणे म्हटले. ‘आरोपींवर लवकरात लवकर खटला भरवणे आवश्यक आहे. विलंबामुळे पीडित व्यक्तींच्या कुटुंबासाठी आणि अटक आरोपींसाठीही न्यायदानात अपयश यायला नको. आरोपींनाही मूलभूत अधिकार आहेत,’ असे न्यायालयाने म्हटले.

दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही हत्यांचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर गुरुवारी सुनावणी होती. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करत आहे, तर पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य सीआयडी करत आहे. त्यासाठी एसआयटी नेमली आहे. ‘फौजदारी गुन्हे न्यायप्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायप्रणालीवरचा लोकांचा विश्वास उडू नये. खटल्यास विलंब होणे, योग्य नाही. कायद्या एखाद्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत तो निर्दोष आहे, असे समजण्यातयेते. त्यामुळे त्या आरोपीला अनिश्चित काळासाठी कारागृहात डांबता येणार नाही,’ असे उच्च न्यायालयाने सांगितले. तसेच पानसरे, दाभोलकर या दोन्ही हत्यांप्रकरणी खटला कधी सुरू करण्यात येणार, याची माहिती २४ मार्चपर्यंत द्यावी, असे निर्देश सीबीआय व सीआयडीला दिले.सीबीआयने मागितली एक महिन्याची मुदतडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वापरलेले शस्त्र मारेकऱ्यांनी ठाण्याच्या खाडीत फेकले. ते शोधण्यासाठी परदेशी पाणबुड्यांचा वापर करण्यात आला. ही शोधमोहीम सुरू असून शस्त्र शोधण्यासाठी महिनाभराची मुदत द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाला केली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागHigh Courtउच्च न्यायालय