शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

'त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?', सुषमा अंधारेंचे राहुल नार्वेकरांना दोन सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:16 IST

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली नसल्याने वाद उभा राहिला आहे. 

धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर विरोधक त्यांची आमदारकी रद्द करण्यासह मंत्रि‍पदाची मागणी करत आहेत. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर दोन दिवस उलटले, तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची आमदारकी रद्द केलेली नाही. त्यावरून आता शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी लक्ष्य केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी लगेच रद्द होणे अपेक्षित होते. यापूर्वी काही आमदारांना शिक्षा होताच तसा निर्णय झाला होता. मात्र, कोकाटेंच्या निर्णयाबद्दल विलंब होत असल्याने विरोधकांकडून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लक्ष्य केले जात आहे. 

राहुल नार्वेकर यांनी या मुद्द्यावर बोलताना न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर अपात्रतेच्या संदर्भात कारवाई केली जाईल, असे सांगितले. 

सुषमा अंधारेंनी दाखवला न्यायालयाचा आदेश

शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल नार्वेकरांच्या विधानाला उत्तर देताना न्यायालयाच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

"माणिकराव कोकाटे प्रकरणांमध्ये नार्वेकर निकालाच्या प्रतीची वाट बघत आहेत मात्र 38पानी निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे. वकील असणाऱ्या नार्वेकरांना सहजासहजी उपलब्ध होत नसेल तर मी द्यायला तयार आहे. कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार? की त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?", असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने १९९५ मधील एका प्रकरणात २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कोकाटे बंधूंनी चार सदनिका लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले. 

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. विधानसभा सचिवालयाकडे आदेशाची प्रत गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदही धोक्यात येऊ शकते. 

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरSushma Andhareसुषमा अंधारेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारCourtन्यायालय