शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उसाला एफआरपी दर देणार

By admin | Updated: January 20, 2015 01:42 IST

यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा ़निर्णय येत्या आठवड्यानंतर घेण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

न्हावरे / मांडवगण फराटा (जि़पुणे) : केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उसाला किफायतशीर वाजवी दर (एफआरपी) प्रमाणे भाव मिळेल, त्याचबरोबर यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा ़निर्णय येत्या आठवड्यानंतर घेण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़ मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ऊस उत्पादकांना उसाला एफआरपीप्रमाणे भाव मिळावा, ही राज्य सरकारची भूमिका आहे. केंद्रातून साखर कारखान्यांना मदत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन साखर निर्यातीवरील अनुदान, कारखान्यांवरील कर्ज, शॉट मार्जिन आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारची मदतीची भूमिका असल्याचा जेटली यांनी शब्द दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ शेतीस पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यास ठिबक सिंचन योजनेसाठी आघाडी सरकारने गेल्या ३ वर्षांपासून थकविलेली सबसिडी मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात देणार असल्याचे सूतोवाच करुन मुख्यमंत्री म्हणाले, दुग्ध उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढताना शासकीय अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळेल याची खबरदारी आम्ही घेतली असून, त्याच्या उपाययोजना शासकीय स्तरावरुन काटेकोरपणे अंमलात आणली जाईल़ मात्र दुधाच्या दराचा प्रश्न मिटविण्यासाठी शाश्वत स्वरुपाचा निर्णय घेण्यात येणार आहे़ आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, मागच्या सरकारने मात्र १०० कोटी रूपये रक्कम दुधउत्पादकांना न देता या व्यवसातील बड्या उद्योजकांच्या घशात घातली़ त्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्यात येत्या काळात अमूल सारखा दुग्ध व्यवसायातील चांगला बँड निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. राज्यात दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना राबविण्यात येत असून जलसंधारणाच्या कामासाठी राज्य शासनाने १००० कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) च्सेंद्रिय शेतीबाबतचे सध्या राज्याचे धोरण असले, तरी बदलत्या परिस्थिती व काळानुरूप ते अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सेंद्रिय शेती करणारे तसेच त्यावर प्रयोग करणारे व तज्ज्ञांच्या सूचना मागवून घेऊन लवकरच राज्य शासन सेंद्रिय शेतीचे नवे धोरण जाहीर करणार आहे.च्स्वयंपूर्ण गावांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे धोरण ठोसपणे राबविले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापुरात भारतीय संस्कृती उत्सव आरंभोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दिली़