शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्या - रिपाइं

By admin | Updated: September 25, 2016 20:36 IST

राखीव मतदार संघातून निवडलेले लोकप्रतिनिधी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने केली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - राज्यात मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये राखीव मतदार संघातून निवडलेले लोकप्रतिनिधी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने केली आहे. त्यामुळे अशा हिंदूत्त्ववादी आणि विषमतावादी राखीव मतदार संघाऐवजी दलितांसाठी शिक्षक मतदारसंघाप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ देण्याची मागणी रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.खरात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाकीत खरे ठरत आहे. राखीव मतदार संघातून निवडून येणारे प्रतिनिधी दलित विरोधी व सवर्णांच्या पक्षाचे मंडलीक म्हणून काम करत आहेत. हे सदस्य संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे फायदे घेतात. मात्र ज्या पक्षाचे सदस्य आहेत, त्या पक्षाच्या सवर्ण व दलित विरोधी विचाराच्या मतदारांनी निवडून दिल्याने त्यांच्याच तत्त्वाप्रमाणे वागत आहेत. याच कारणास्तव भारतीय जनता पार्टी, शिवसेना व इतर पक्षाचे सदस्य संसदेत व विधीमंडळात राखीव मतदार संघातून निवडून येत आहेत. मात्र दलितांच्या प्रश्नांऐवजी ते दलित विरोधी विचारांनाच पाठिंबा देत आहेत.रिपाइंने आमदार संतोष सांबरे, अभिजीत घोलप, प्रणिती शिंदे यांनी काढलेल्या पत्रकाला कडाडून विरोध केला आहे. याशिवाय राहुले शेवाळे, कृपाल तुम्हाने, भाऊसाहेब लोखंडे व रवींद्र गायकवाड या आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षाचे सदस्य म्हणून निषेध नोंदवला आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्याविरोधात मागणी करणाऱ्या मोर्चात या लोकप्रतिनिधींनी सामील होऊ नये, अशी रिपाइंचीभूमिका आहे. त्यासाठी संसद आणि विधीमंडळात दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी रिपाइंने केली आहे. जेणेकरून या मतदार संघात दलित मतदान करतील आणि दलितच निवडून येतील. तेव्हाच दलितांचे प्रश्न मांडले जातील आणि सोडवलेही जातील, असा विश्वास रिपाइंने व्यक्त केला आहे.