शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:03 IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडची प्रतीक्षा कायम : कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानंतर महामंडळाचा निर्णय

मुंबई : कोल्हापूर औद्योगिक न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशामुळे राज्यातील बहुतांश विभागांतील एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागातील कर्मचाऱ्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत बदलीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तूर्तास राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ विभागातील कर्मचाºयांना बदलीसाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी सोमवारी दिले आहेत. संबंधित विभागांत विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या चालक व वाहक संवर्गातील कर्मचाºयांना या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे इतर विभागांतील कर्मचाºयांबाबत स्थगिती उठवल्याने संबंधित कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेशही काळे यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत. तसेच कर्मचाºयांना कार्यमुक्त केल्याचा अहवाल उलट टपाली वाहतूक भवन कार्यालयास पाठवण्याचे आदेशही काळे यांनी दिले आहेत.

दरम्यान, रत्नागिरी विभागातील ज्या चालक कर्मचाºयांच्या विनंती बदल्या लातूर, परभणी, सातारा, बुलडाणा व धुळे या विभागात केलेल्या आहेत, त्यांना कार्यमुक्त करू नये, असेही महामंडळाने म्हटले आहे. तसेच सिंधुदुर्ग विभागातून परभणी व अहमदनगर विभागात बदली केलेले चालक आणि कोल्हापूर व अहमदनगर विभागात बदली केलेल्या वाहकांनाही पुढील आदेश देईपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे महामंडळाने आदेशात म्हटले आहे. पुणे विभागात बदलीवर जाणाºया चालक व वाहकांना तत्काळ कार्यमुक्त करून पुणे विभागातून बदलीवर जाणाºया कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार कार्यमुक्त करण्यास महामंडळाने सांगितले आहे. रायगड विभागाने स्थगिती उठवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.औरंगाबादला दिलासाऔरंगाबाद विभागात बदलीवर जाणाºया कर्मचाºयांना सर्व विभागांनी विनासबब सोमवारी, २५ फेब्रुवारीलाच कार्यमुक्त करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.