शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 20:47 IST

ही सुविधा गुरुवारपासून बंद करण्याचे एसटीने आदेश दिले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्याला मुदतवाढ दिली आहे. 

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस आपली सेवा देत आहे. या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या विशेष फेऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून चालविण्यात येत आहेत.

मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धांचा मान दिला गेला आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राज्य सरकारच्या कर्मचारी, मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना एसटीच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ही सुविधा गुरुवारपासून बंद करण्याचे एसटीने आदेश दिले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्याला मुदतवाढ दिली आहे. 

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस आपली सेवा देत आहे. या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या विशेष फेऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून चालविण्यात येत आहेत. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून कामावर जात असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना मोफत प्रवास देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार महानगरपालिका आणि राज्य शासनाने एसटी महामंडळाला आगाऊ रक्कम अदा केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या प्रवासामध्ये तिकीट आकारण्यात येऊ नये, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच वाहकांकडून या कर्मचाऱ्यांना तिकीट देऊन तिकीटच्या मागे त्याची संपूर्ण माहिती लिहून घेतली जात होती. मात्र ही सुविधा गुरुवार पासून बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला होता. परंतु, महानगरपालिकेने याला मुदतवाढ दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेने एसटीमध्ये महापालिका कर्मचार्यांनासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ती सुविधा  बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  मोफत प्रवास मिळणार आहे.- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक

एसटीचे दुसऱ्यांदा परिपत्रक रद्दअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून मोफत प्रवास बंद अशा आशयाचे परिपत्रक एसटीने दुसऱ्यांदा रद्द केले आहे. राज्य सरकारकडून परिपूर्तीची रक्कम एसटीला मिळणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील मुंबई महापालिका कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी, पोलीस, शासकीय कर्मचारी यांचा प्रवास मोफत सुरू राहणार आहे.

आणखी बातम्या...

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...    

'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील    

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद    

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस