Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार ‘गणेशोत्सव’, पाहा महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:29 IST2026-01-23T13:28:40+5:302026-01-23T13:29:31+5:30

Republic Day Parade 2026 Maharashtra Tableau: यावेळच्या प्रजासत्ताक दिनामध्ये दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचाही चित्ररथ दिसणार असून, या चित्ररथामधून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा देखावा पाहता येणार आहे.

'Ganeshotsav' to be seen on the road to duty on Republic Day, see the first glimpse of Maharashtra's Chitrarath | Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार ‘गणेशोत्सव’, पाहा महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक 

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार ‘गणेशोत्सव’, पाहा महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक 

Republic Day Parade 2026: देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, २६ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमधील कर्तव्य पथावर होणारं लष्कराचं संचलन, शस्त्रास्त्रांचं  प्रदर्शन, थरारक कवायती आणि देशाभरातील विविध राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ हे तर खास आकर्षण असतं. दरम्यान, यावेळच्या प्रजासत्ताक दिनामध्ये दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचाही चित्ररथ (Maharashtra Tableau) दिसणार असून, या चित्ररथामधून महाराष्ट्रातीलगणेशोत्सवाचा देखावा पाहता येणार आहे.

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राच्या यावर्षीच्या चित्ररथासाठी आत्मनिर्भरतेचं प्रतीक-गणेशोत्सव ही संकल्पना मांडण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये शाडू मातीपासून घडवलेल्या गणेश मूर्तींच्या प्रतिकृती. कोकणात पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून नेण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती, अष्टविनायकांच्या प्रतिकृती, गणेश मंदिरे आदी मांडण्यात आली आहेत. याबरोबरच या चित्रपटासोबत विविध कलाकार हे महाराष्ट्रामधील लोककला आणि परंपरांचंही दर्शन घडवणार आहेत.

दरम्यान, २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनावेळी होणाऱ्या पथसंचालनामध्ये देशातील १७ राज्ये आणि १३ मंत्रालयांचे मिळून ३० चित्ररथ सहभागी होणार आहेत.  

Web Title : गणतंत्र दिवस परेड में गणेशोत्सव: महाराष्ट्र की झांकी का अनावरण

Web Summary : महाराष्ट्र की गणतंत्र दिवस झांकी में गणेशोत्सव त्योहार का प्रदर्शन होगा। इसमें गणेश मूर्तियाँ, अष्टविनायक प्रतिकृतियाँ और लोक कला शामिल हैं, जो महाराष्ट्र की संस्कृति को उजागर करती हैं। सत्रह राज्य भाग लेंगे।

Web Title : Ganeshotsav to Grace Republic Day Parade: Maharashtra's Tableau Unveiled

Web Summary : Maharashtra's Republic Day tableau will showcase the Ganeshotsav festival. It features Ganesh idols, Ashtavinayak replicas, and folk art, highlighting Maharashtra's culture. Seventeen states will participate.