शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

वितरकाकडून होणाऱ्या वाहन नोंदणीत फसवेगिरी

By admin | Updated: August 24, 2016 02:12 IST

खरेदी केलेल्या नव्या वाहनांची डीलर्सकडून आरटीओकडे नोंदच केली जात नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- खरेदी केलेल्या नव्या वाहनांची डीलर्सकडून आरटीओकडे नोंदच केली जात नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहन मालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तर आरटीओकडे नोंदच नसलेली वाहने एखाद्या गुन्ह्यात वापरली गेल्यास पोलिसांपुढे देखील तपासाचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.बदलत्या राहणीमानानुसार सध्या स्वत:चे घर झाले की कार पाहिजेच अशी नागरिकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी नव्या तसेच जुन्या वाहनांची खरेदी - विक्री करणारी डीलर्सची कार्यालये ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. त्यापैकी काही डीलर्स त्यांच्याकडून खरेदी झालेल्या वाहनांची नोंद आरटीओकडे करतच नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे वाहन खरेदी करणाऱ्याकडून आरटीओच्या संपूर्ण प्रक्रियेची आवश्यक रक्कम घेवून देखील नोंदणीच्या प्रक्रियेला विलंब केला जात आहे. त्यामुळे वाहन मालकांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. असाच प्रकार कोपरखैरणेत राहणाऱ्या संदेश कुलकर्णी यांच्यासोबत घडला आहे.कुलकर्णी यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये नेरुळच्या शोरुममधून स्विफ्ट डिझायर कार खरेदी केलेली आहे. यावेळी कारच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया यांनी याच डीलरमार्फत पूर्ण केलेली होती. त्यानुसार ६२ हजार रुपये कर भरल्याची रीतसर पावती देखील त्यांना देण्यात आलेली आहे. केवळ वाहनाचा नंबर पसंतीचा पाहिजे असल्यामुळे कुलकर्णी यांनी स्वत: आरटीओ कार्यालयात जावून निवडक नंबर घेतलेला आहे. त्याची ५ हजार रुपयांची पावती देखील तत्कालीन अधिकाऱ्याने त्यांना दिलेली आहे. त्यानुसार गेली नऊ महिन्यांपासून कुलकर्णी त्यांची कार वापरत आहेत.यादरम्यान मागील महिन्यात एका अपघातामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले. त्याचा खर्च इन्शुरन्समार्फत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता, त्यांच्या वाहनाची आरटीओकडे नोंदच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे कारची नोंदणी झाल्याच्या दिलेल्या पावत्या खऱ्या की खोट्या असाही प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. सदर कारचा गंभीर अपघात अथवा चोरी झाली असती, तर कुलकर्णी हे कायदेशीर अडचणीत सापडले असते. शिवाय पोलिसांपुढेही तपासाचे आव्हान निर्माण झाले असते. यामुळे मानसिक धक्का बसल्याने कुलकर्णी हे गेला महिनाभर आरटीओ तसेच वितरकाच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. त्यानंतरही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संबंधतिांवर कारवाईची मागणी संदेश कुलकर्णी यांनी केली आहे.या प्रकारावरून वाहनांचे वितरक ग्राहकांकडून पैसे घेवूनही आरटीओकडे त्यांच्या वाहनांची नोंदच करत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामागे मोठे रॅकेट देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय इतर वाहनांच्या बाबतीत देखील असाच प्रकार झालेला असल्यास वितरकांची कार्यपध्दतच संशयाच्या घेऱ्यात येणार आहे. तसेच या प्रकारामुळे आरटीओ व वितरक दोघांच्याही कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.>वाहनांची खरेदी - विक्री करणारी डीलर्सची कार्यालये ठिकठिकाणी दिसतात. त्यापैकी काही डीलर्स त्यांच्याकडून खरेदी झालेल्या वाहनांची नोंद आरटीओकडे करतच नाही. विशेष म्हणजे वाहन खरेदी करणाऱ्याकडून आरटीओच्या संपूर्ण प्रक्रियेची आवश्यक रक्कम घेवूनही विलंब केला जात आहे. मागील महिन्यात एका अपघातामध्ये कुलकर्णी यांच्या कारचे नुकसान झाले. त्याचा खर्च इन्शुरन्समार्फत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता, वाहनाची आरटीओकडे नोंदच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे कारची नोंदणी झाल्याच्या दिलेल्या पावत्या खऱ्या की खोट्या असाही प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.