शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यात भरतीच्या नावावर फसवणूक, यूपीत तिघांना अटक; मिलिटरी इंटेलिजन्सने केला टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 12:59 IST

‘लाेकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शुभम शर्मा, राहुल शर्मा व महेंद्र पाल यांचा समावेश असून, ते उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील बसई गावचे आहेत.

आशिष दुबे -

नागपूर : लष्करात भरतीच्या नावावर युवकांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा मिलिटरी इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे. इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील पाेलिसांनी टाेळीच्या सूत्रधारासह इतर दाेन आराेपींना अटक केली आहे. ही टाेळी काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये झालेल्या सैन्य भरतीदरम्यान सक्रिय हाेती. ‘लाेकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शुभम शर्मा, राहुल शर्मा व महेंद्र पाल यांचा समावेश असून, ते उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील बसई गावचे आहेत. कामठी येथे ५ सप्टेंबर २०२१ ला सेनेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. देशभरातून तरुण या भरतीसाठी पाेहोचले हाेते. टाेळीचा सूत्रधार शुभम शर्मा त्याच्या भावाला घेऊन कामठीला आला. त्याची भेट उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील लवलेश कुमार यादव या तरुणाशी झाली. शुभमने त्याचा माेबाईल क्रमांक मिळवला. शुभमने नंतर लवलेशचा माेबाईल नंबर त्याचा चुलत भाऊ आराेपी राहुल शर्माला दिला. पुढे शुभमने लवलेशशी संपर्क करून स्वत:ची लष्करात उच्च अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत त्याला नाेकरीचे आमिष दाखवून २० हजार रुपयाची मागणी केली. भरती झाल्यानंतर उर्वरित ८० हजार देण्यास सांगितले. लवलेश तयार झाला. शुभमने दिलेल्या माेबाईल क्रमांकावर संपर्क केल्यानंतर आराेपी राहुलने काॅल घेत स्वत: लष्करी अधिकारी असल्याचे सांगत, नोकरीचा विश्वास दिला. साेबतच बँक खात्याचा क्रमांक देऊन २० हजार जमा करण्यास सांगितले. हे खाते आराेपी महेंद्र पालचे हाेते. 

असे आले उजेडात प्रकरण तरुणांना ठकबाजांपासून वाचविण्यासाठी मिलिटरी इंटेलिजन्सही सक्रिय हाेते. त्यांनी संशयितांवर नजर ठेवली. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्याची एक टाेळी सेनेत भरतीच्या नावावर तरुणांची फसवणूक करीत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. प्रकरणाचा तपास करीत १६ सप्टेंबरला इंटेलिजन्सने बरेलीच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. बरेली गुप्तचर विभागाने स्थानिक पाेलिसांना माहिती देत एफआयआर दाखल केला. १७ सप्टेंबरला तिन्ही आराेपींना अटक करण्यात आली. 

टॅग्स :fraudधोकेबाजीUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी