शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या ट्रँक्वीलायझर गन धूळ खात पडून

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

वन विभागाकडे ट्रँक्विलायझर गन (जनावरांना बेशुद्ध करणारी बंदूक) पडून असून, केवळ अकोला वन्यजीव विभागातच या गनचा वापर करण्यात येत आहे.

अकोला : गत काही महिन्यांपासून बिबट, अस्वलासारखे वन्यप्राणी गावात शिरून गावकर्‍यांवर हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा स्थितीत पश्‍चिम वर्‍हाडातील जिल्हय़ांमध्ये वन विभागाकडे ट्रँक्विलायझर गन (जनावरांना बेशुद्ध करणारी बंदूक) पडून असून, केवळ अकोला वन्यजीव विभागातच या गनचा वापर करण्यात येत आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्हय़ांमध्ये वन खात्याचे दोन उपविभाग असून, दहापेक्षा जास्त रेंज आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्र शेकडो किमी पसरलेले आहे; मात्र तीनही जिल्हे मिळून केवळ अकोला येथील वन्यजीव विभागातील ट्रँक्विलायझर गनचाच वापर होत आहे. अन्य कार्यालयांमध्ये ट्रँक्विलायझर गन असल्या, तरी त्याचा वापर करण्यात येत नाही. तीनही जिल्हय़ात कुठेही वन्यप्राणी विहिरीत पडले किंवा गावात शिरून गावकर्‍यांवर हल्ला केला, तर अकोल्याहून पथक पाठविण्यात येते. बुलडाणा येथे बिबट्यासारख्या वन्यप्राण्याने हल्ला केला, तर तेथे अकोला येथून पथक पोहोचण्यासाठी तीन तास लागतात. तोपर्यंत अनेक जण जखमी होऊ शकतात किंवा मृत्यूमुखीही पडू शकतात. गत महिन्यात बुलडाणा जिल्हय़ातील नांदुरा येथे बिबट्याने गावात शिरून गावकर्‍यांवर हल्ला केला होता. नांदुरा येथे अकोला येथून पथक पोहोचण्यासाठी दोन तास लागले. या वेळात बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला होता. गत काही वर्षांपूर्वी वन विभागाला ट्रँक्विलायझर गन देण्यात आल्या होत्या; मात्र या गनचा वापर होत नसून, त्या तशाच पडून आहेत. तीन जिल्हय़ात कोठेही वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली, तर अकोला येथूनच पथक पाठविण्यात येते. वन विभागाने प्रत्येक वन परिक्षेत्र अधिकार्‍याला रिव्हॉल्वर दिली आहे.