शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 07:04 IST

आतापर्यंत राज्यात चित्र : ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पंचनामे करतानाचे निकष : नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी, ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक 

पुणे : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो,  ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी तसेच ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. 

राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, हे पंचनामे करताना शेतीचे नुकसान झाल्याचे जीपीएस अद्ययावत असलेले फोटो काढले जात आहेत. तसेच ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी केलेल्या क्रमांकाचाही पंचनाम्यामध्ये समावेश केला जात आहे. ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे.  

जीपीएसमधून फोटो आवश्यक नुकसानग्रस्त पिकांचा फोटो जीपीएसमधून काढून त्यावर अक्षांश व रेखांश असणे आवश्यक आहे. असे फोटो ग्रामसेवक आपल्याकडे ठेवत आहेत. सध्या तरी हे पंचनामे ऑफलाइन करण्यात येत आहेत. गरजेनुसार अहवालाला हे फोटो लावण्यात येतील. सरकारने नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी निकष लावण्याचे आदेश यापूर्वीच दिले असून त्यानुसारच पंचनामे सुरू आहेत, असे सुत्रांनी स्पष्ट केले.  

नोंद न केलेल्यांचे काय? राज्यात आतापर्यंत केवळ ५६ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर अर्थात ई-पीक पाहणीमध्ये झाली आहे. त्यामुळे मदत करताना नोंद न केलेल्या शेतकऱ्यांचे काय?

भाजपचे आमदार-खासदार महिन्याचे वेतन देणारराज्याच्या विविध भागांत पूर व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपचे सर्व आमदार व खासदार महिन्याभराचे वेतन मदतनिधीत देणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का? ठाकरे‘पावसाने तुमची शेती नाही तर आयुष्य वाहून गेलं आहे. प्रत्येकवेळी योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ असं सांगता, तुमची ही योग्य वेळ कधी येणार आहे? का यासाठीही तुम्ही पंचांग पाहणार आहात? असा थेट सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला गुरुवारी केला. सरकारने हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

कळंब तालुक्यातील इटकूर येथे  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामी, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aid Blocked: Farmers face criteria hurdle amid crop loss.

Web Summary : Despite assurances, strict criteria like GPS photos and e-crop registration hinder farmers from receiving promised aid after heavy rain damage across 33 lakh hectares. Political leaders demand immediate relief and compensation.
टॅग्स :floodपूरFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र