शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यबीजोत्पादन घटले!

By admin | Updated: August 20, 2014 21:54 IST

कृषी विद्यापीठाला फटका : पावसाने पाठ फिरविल्याचा परिणाम

अकोला : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मत्स्य बीजोत्पादन घटले आहे. गतवर्षी वीस हजार मत्स्य बीजांची विक्री करणार्‍या या विद्यापिठाकडे यंदा मत्स्यबीज उपलब्धच नसल्याने मत्स्य शेती करणार्‍या शेतकर्‍यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

कृषी विद्यापिठात स्वतंत्र मत्स्य विभाग असून, या विभागाच्या क्षेत्रावर आठ ते दहा तळी व हॅचरी बांधण्यात आली आहेत. या तळ्य़ात रोहू, कथला व मृगळ या जातींची मासे व मत्स्यबीज तयार केले जाते. मत्स्य शेती करणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षी येथून वीस ते पंचविस हजार मत्स्य बिजांची विक्री केली जाते. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने तळे कोरडे पडले आहेत. वास्तविक मत्स्य व्यवसाय करण्यासाठी विदर्भाला जवळपास २५ ते ३0 कोटी मत्स्यबीजांची गरज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यंदा कोलकाता येथून मत्स्यबीज आणावे लागणार असल्याने, तो खर्चही वाढणार आहे. जुलैमध्ये मत्स्य बीजनिर्मिती करू न तळ्य़ात सोडली जातात. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या बिजांची शेतकर्‍यांना विक्री केली जाते. यामध्ये बोटुकली, अर्धबोटुकली आकारांचे मत्स्यबीज असतात. विद्यापीठात मत्स्यसंवर्धन, संगोपनासह संशोधनाचेही काम केले जात असून, अनेक शोभिंवत रंगीत माशांची पैदास करण्यात आली आहे. या माशांना अधिक मागणी आहे; परंतु गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या मत्स्य विभागाची ही कामंदेखील थंडावली आहेत.