शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १०८ आयटीआय निदेशक झाले प्राचार्य

By admin | Updated: September 6, 2016 04:31 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदासाठी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल घोषित झाला

ज्ञानेश्वर मुंदे,

यवतमाळ- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदासाठी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल घोषित झाला असून राज्यातील तब्बल १०८ आयटीआय निदेशक प्राचार्यपदी नियुक्त होणार आहेत. गत तीन वर्षांपासून शासनाच्या वेळकाढू धोरणाने या नियुक्त्या रखडल्या होत्या, हे विशेष!उद्योगास कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकासाचे धडे मिळावे यासाठी शासनाने कौशल्य विकास आणि उद्योजकता हे नवीन खाते तयार केले आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकविले जातात. परंतु राज्यातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक आयटीआयमध्ये प्राचार्य पद रिक्त होते. २००१ पासून सरळ सेवेने प्राचार्य पद भरण्यात आले नव्हते. त्यामुळे विविध अडचणी निर्माण होत होत्या. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या पदासाठी आॅक्टोबर २०१३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. मार्च २०१४ मध्ये या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र शिक्षणसेवा गट अ, गट अ (कनिष्ठ) आणि गट ब च्या विविध पदांसाठी ही भरती होती. मात्र निकाल घोषित होत नव्हता. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर दोन वर्षानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये या परीक्षेचा निकाल लागला. उद्योजकता विकास विभागास एमपीएससीने उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्याचे सुचविले. परंतु वर्ष लोटूनही या निदेशकांना प्राचार्यपदाची नियुक्ती दिली जात नव्हती. राज्यातून या परीक्षेत १०८ आयटीआय निदेशक प्राचार्य पदासाठी पात्र झाले होते. त्यात यवतमाळ येथील संदीप बोरकर, वणी येथील गजानन राजूरकर आणि राहुल पळवेकर यांचा समावेश होता. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही उपयोग होत नव्हता. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. अखेर ३१ आॅगस्ट रोजी शासनाच्या संकेतस्थळावर या सर्वांची अधिकृत नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. येत्या आठ दिवसात १०८ उमेदवार प्राचार्यपदी नियुक्त होणार आहेत.केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने मेक इन इंडिया धोरण राबविले जात आहे. तरुणांना किमान कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु प्राचार्याअभावी आयटीआयचे काम ढेपाळले होते. आता या नियुक्तीमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.