शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:55 IST

केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मलिक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शविला आहे. या तीनपैकी दोन कायद्यांबाबत राज्य सरकारला अधिकारच नाहीत.

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सर्व विरोधक आणि शेतकरी संघटना मैदानात उतरले आहेत. आज ना उद्या सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री आगामी काळात या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सांगितले.केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मलिक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शविला आहे. या तीनपैकी दोन कायद्यांबाबत राज्य सरकारला अधिकारच नाहीत. तर, शेती विषय राज्यांच्या अखत्यारित असताना केंद्र सरकारने परस्पर कायदा बनविला आहे. त्याला मोठा विरोध होत आहे. आंदोलनाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानेच या कायद्यांना स्थगिती दिली. त्यामुळे सरकारला आता कायदे मागे घेण्याची संधी आहे. प्रतिष्ठेचा विषय न करता केंद्राने हे कायदे मागे घ्यावेत. शिवाय, शेतकऱ्यांचा विरोध पाहता आज ना उद्या सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील, असेही मलिक यांनी सांगितले.दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात मुख्यमंत्री आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार असल्याच्या मलिक यांच्या विधानाचा भाजप नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाकाळात घराबाहेर पडले नव्हते. घराबाहेर पडता यावे म्हणूनच त्यांनी कृषी कायद्याचा बहाणा शोधला आहे. ते घराबाहेर पडल्यास काही लोकांना नक्कीच आनंद होईल. मात्र, आंदोलन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करावा. राज्याची नेमकी काय भूमिका आहे, शरद पवार यांनी अशा प्रकारच्या कायद्याबाबत काय भूमिका घेतली होती, हे आधी जनतेसमोर मांडावे आणि मगच भूमिका घ्यावी, असे आव्हान शेलार यांनी दिले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाnawab malikनवाब मलिक