शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Maharashtra Election 2019; झोपेतही अमित शहा ३७०-३७० च म्हणत असतील : शरद पवारांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 5:26 PM

 बार्शी येथील राष्ट्रवादीच्या सभेत नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली टीका

ठळक मुद्दे- बार्शी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रचार सभा- शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली जोरदार टीका- सरकारच्या कामाबद्दल शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी

सोलापूर/बार्शी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिकडे जातील तिकडे ३७०-३७० असे करीत आहेत. काश्मीरमधील ३७० रद्द केले, त्याचा आम्हाला आनंद आहे व आमचा पाठिंबाही आहे. पण कोण चाललंय जमीन घ्याला काश्मीरला. दिवस-रात्र अमित शहा ३७०-३७० म्हणत आहेत़ रात्री झोपेतही ३७० म्हणत असतील, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांना यांच्यावर केली़

बार्शी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, मी ५२ वर्षे निवडून जातोय़ मतदार उगीच आम्हाला निवडून देत नाहीत़ आम्हाला काय केले म्हणणाºयांनी शिवस्मारकाचे काय झाले, इंदू मिलचे काय झाले, असा सवाल करत महाराजांच्या नावाची खोटी आश्वासने या सरकारने दिली आहेत. आम्ही शिवरायांची परंपरा जतन केली. मात्र हे सरकार शिवरायांचे किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याचा ठराव करते आहे. किल्ल्यावर आता तलवारींच्या खणखणाटाऐवजी झमझम पाहिजे काय? शिवराय व बाबासाहेबांच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करीत आहे हे लोकांना कळून चुकले आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

भाजप सरकारच्या कार्यकाळात शेती व शेतकरी अडचणीत सापडला आहे. १६ हजार शेतकºयांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत, मग ही कसली कर्जमाफी. शेतकºयांची फसवणूक करणारी यांच्यासारखी दुसरी राजवट नाही, अशी टीका पवार यांनी केली. आम्ही आजवर टेंभुर्णी, इंदापूर, कुरकुंभ, चाकण अशा कितीतरी औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. हजारो कारखाने काढून बेरोजगारांच्या हातांना काम दिले. यांच्या राजवटीत कारखाने बंद पडायला लागले आहेत. आर्यन कारखानाही बंद आहे, मग यांना मत का द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांचे नागपूर हे गुन्हेगाराचे केंद्र बनले आहे. भाजपचे अनेक स्वामी महिलांवर अत्याचार करीत आहेत. अशा बेशरम माणसांना त्यांची जागा दाखवा. महिलांना सन्मान नाही, हाच का शिवछत्रपतींचा आदर्श, काय चाललंय या राज्यात? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणbarshi-acबार्शी