शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:43 IST

आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. 

कोल्हापूर -  नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला, एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. कोल्हापूरातील मेळाव्यात ते बोलत होते. 

यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले की, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल… गुलाल आम्हीच उधळणार आहोत. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापूर्वीप्रमाणेच याही निवडणुकांमध्ये येथे भगवा फडकणारच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसैनिक हा पक्षाचा आत्मा असल्याचे सांगत, जो काम करेल तोच पुढे जाईल. कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि दमदार तयारीवरच शिवसेना उभी आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे मदत पॅकेज, कर्जमाफीसाठी प्रक्रिया, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना, बचत गटांना वाढीव निधी, तर कोल्हापूरसाठी पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पाला ५०० कोटी, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी आणि आयटी पार्कसह मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. 

दरम्यान, लोकसभेत खोटा नॅरेटिव्ह पसरवला, पण विधानसभेत आम्ही त्यांचा टांगा पलटी केला. आता नगरपालिकांमध्येही त्यांच्या गोटात फरफट होणार. महाराष्ट्राच्या जनतेने मोगलाई चालणार नाही हे दाखवून दिलं आहे. कोल्हापुरात कुस्तीची ताकद आहे, विरोधकांना थेट धोबीपछाड द्या. गाव तिथे शिवशाही, घर तिथे शिवशक्ती. मतदार यादी तपासा, आपला मतदार राहिला पाहिजे. बूथप्रमुख हा विजयाचा शिल्पकार आहे. निवडणुकीतच नाही तर संकटातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहा. सत्ता येते-जाते पण नाव आणि मान गेले तर परत येत नाही असं आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

दिवाळीपेक्षाही मोठे फटाके फुटणार

शिवसेना हा पक्ष नसून कुटुंब आहे. आम्ही  माणसांना प्रेम देतो. रोज शेकडो प्रवेश होत आहेत. १०२ संघटना पक्ष प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. शिवसेनेवर  विश्वास वाढत चाललाय. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ३ तारखेला दिवाळीपेक्षाही मोठ्या फटाक्यांची रोषणाई महाराष्ट्रात होणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition's Rule Over, Now the Saffron Era; Big Celebration on Dec 3

Web Summary : Eknath Shinde declared war on opponents, promising victory in local elections. He announced development projects for Kolhapur and criticized previous governments. Shinde emphasized Shiv Sena's strength and predicted a massive celebration on December 3rd.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती