शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 07:47 IST

एका निरोपाच्या गोंधळामुळे शिंदे दिल्लीत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे बैठक होऊ शकली नाही.

यदु जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविले, त्यानुसार भाजप, अजित पवार गटाचे नेते दिल्लीत रात्री पोहोचलेदेखील; पण मध्येच लक्षात आले की बैठकीचा स्पष्ट निरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेलाच नाही. परिणामत: शिंदे दिल्लीत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे बैठक होऊ शकली नाही.

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरू शकलेला नाही. अमित शाह यांनी राज्यातील नेत्यांना आधीच सांगून ठेवलेले होते की, ज्या जागांवर तुमच्यामध्ये एकमत होणार नाही, त्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत या, आपण निर्णय घेऊन टाकू. जवळपास ३० जागा अशा आहेत की ज्यावर तिन्ही पक्षांचे एकमत होऊ शकलेले नाही. काही जागांवर तिघांचा तर काहींवर दोन पक्षांचा दावा असल्याने अंतिम जागावाटप अडले आहे. संमती झालेल्या जागांवर उमेदवार तिन्ही पक्षांनी जाहीर केले आहेत. अडकलेल्या जागा सोडविण्यासाठी बुधवारी दिल्लीत जाण्याचे ठरले.

त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,  खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे हे रात्री एकाच विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले. सगळे विमानात बसले आणि मग असे लक्षात आले की शिंदे यांनी बुधवारी रात्रीच दिल्लीत पोहोचायचे आहे असा स्पष्ट निरोप त्यांना दिला गेलेला नाही.

शिंदे आज सकाळी जाणार

  • शिंदेंना निरोप गेला नसल्याने मग धावपळ, फोनाफोनी सुरू झाली. तोवर असे कळले की शिंदे हे विमानाने गुवाहाटीवरून गोव्याला जायला निघाले आहेत. त्यामुळे त्यांना निरोप देता येणे शक्य नव्हते.
  • ते गोव्याला उतरून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळला निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशासाठी जाणार होते. राणे यांनी मोठी तयारी केली होती आणि तो कार्यक्रम रद्द करणे शक्य नव्हते आणि दुसरे म्हणजे तेवढ्या वेळात परत दिल्लीला जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे शिंदे हे कुडाळच्या कार्यक्रमाला गेले आणि मग चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रात्री उशिरा परतले.
  • ते दिल्लीला जाऊ शकले नाहीत, त्यामुळे अमित शाह यांच्याबरोबरची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकली नाही. फडणवीस, अजित पवार, पटेल, तटकरे आणि नागपूरहून पोहोचलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यामुळे दिल्लीतच मुक्काम करावा लागला. आता शाह यांच्यासोबत आज, गुरुवारी सकाळी बैठक होणार आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीdelhiदिल्ली