शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ई-बालभारती मंडळ स्थापन करणार

By admin | Updated: May 2, 2015 01:12 IST

बालभारती मंडळात ई-लर्निंग सुविधा निर्माण करून ई-बालभारती मंडळ स्थापन करण्याचा विचार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

पुणे : बालभारती मंडळात ई-लर्निंग सुविधा निर्माण करून ई-बालभारती मंडळ स्थापन करण्याचा विचार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. समितीत संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर यांचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. बालभारतीमध्ये शालेय पुस्तकांचा अभ्यासक्रम व निर्मिती करण्यात येते. मात्र, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल. केवळ पुस्तकांचे वाचन करण्याऐवजी त्यामध्ये टॅबलेटद्वारे व्हिज्युअल चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादा विषय समजून घेणे सोपे जाईल. त्यासाठी शिक्षण व संगणक क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती तयार करण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले. विश्व संमेलनाच्या खर्चास नकारसाहित्य संमेलनाप्रमाणे विश्व साहित्य संमेलनासाठी शासनाने निधी देण्याची मागणी साहित्य महामंडळाने केली आहे. मात्र, विश्व साहित्य संमेलनाची परदेशवारी शासनाच्या खर्चातून करता येणार नाही. त्यासाठी बाहेरून निधी उपलब्ध करून देता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.विश्व साहित्य संमेलनासाठी दक्षिण अफ्रिकेचे निमंत्रण आले आहे. परंतु, त्यासाठी निम्मा खर्च साहित्य महामंडळाला करावा लागणार आहे. त्यामुळे २५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. गतवर्षी शासनाने निधी दिला होता. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारनेही निधी देण्याची मागणी केली आहे. त्याविषयी तावडे म्हणाले, शासन परदेशवारीसाठी थेट निधी देऊ शकणार नाही. मात्र, बाहेरून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. (प्रतिनिधी)