शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी प्रसंगी कर्ज काढू !

By admin | Updated: September 2, 2015 04:33 IST

मराठवाड्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. कधी गारपीठ होते, तर कधी अवर्षण. नैसर्गिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकार प्रसंगी कर्ज काढेल, पण शेतकऱ्यांना सावरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.

दत्ता थोरे, लातूरमराठवाड्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. कधी गारपीठ होते, तर कधी अवर्षण. नैसर्गिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकार प्रसंगी कर्ज काढेल, पण शेतकऱ्यांना सावरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात मंगळवारी लातूर जिल्ह्यापासून सुरू केली. दुपारी मुख्यमंत्र्यांनी येरोळमोड (ता. शिरूर अनंतपाळ), निटूर आणि गौर, (ता. निलंगा), तुपडी (ता. निलंगा), जयनगर आणि आशिव (ता. औसा) आदी गावांना भेट घेऊन पाहणी केली.मुख्यमंत्री म्हणाले, की पाण्याच्या टँकरसाठी सरकारने ८० कोटींची विशेष तरतूद केली आहे. माणसांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहेच; शिवाय जनावरांच्या पाण्यासाठी १० टक्के अतिरिक्त पाणी देण्याचे निर्देश दिले आहेत. चारा नसेल तर बाहेरून आणला जाईल. विद्यार्थ्यांची फी माफ केली आहे. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांची फीसुद्धा माफ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. चारा छावणीसाठी १५ लाख रुपयांची ठेव ही पाच लाखांवर आणली. ५०० जनावरे असल्याशिवाय छावणी सुरू न करण्याची अट काढून २५० वर आणली आहे. शेतकऱ्यांना तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुंबई : मागील वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केलेले, परंतु खर्च होऊ न शकलेले १,५०० कोटी रुपये वाचले होते. त्यामुळे यंदाही अशी अखर्चित रक्कम शिल्लक राहिल्यास दुष्काळाच्या उपाययोजना करण्याकरिता त्याचा वापर केला जाऊ शकेल. त्यामुळे दुष्काळाकरिता विकासाच्या योजनांस कात्री लावण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.मुनगंटीवार म्हणाले की, दुष्काळाच्या संकटाचा सामना करताना पैशाकडे पाहिले जाणार नाही. तसेच केंद्र सरकारची मदत येण्याची वाट पाहिली जाणार नाही. तशीच गरज लागली तर कर्ज काढले जाईल. परंतु कर्ज काढण्याची किंवा विकासकामांना कात्री लावण्याची वेळ येणार नाही. मागील वर्षी वेगवेगळ््या खात्यांकडील अखर्चित रक्कम १,५०० कोटींच्या आसपास होती. अशा शिल्लक रकमेचे समायोजन केले तरीही पुरेसा पैसा उपलब्ध होऊ शकतो.नरेगामध्ये कोणकोणती कामे घ्यायची, त्याचे निकष ठरलेले आहेत. दुष्काळी भागात शेतकऱ्यांचे शेत समतोल करून घेणे, रस्ता तयार करणे किंवा शेततळी बांधणे यासारखी शेतीशी निगडीत शाश्वत कामे करण्याकरिता राज्य सरकार मराठवाड्यातील दुष्काळी भागात राज्य सरकारच्या रोजगार हमीची कामे घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.छावणीऐवजी दावणीला चारा द्याबीड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो शेतकऱ्यांसाठी त्रासदायकच आहे. हाच छावणीत दिला जाणारा चारा दावणीला देण्यात आला तर शेतकऱ्यांना चांगली मदत होईल, अशी भूमिका कृषिभूषण शिवराम घोडके यांनी मांडली. ते ‘लोकमत’शी बोलत होते. चारा छावणीत जनावरे घेऊन जायचे म्हणजे शेतकऱ्यांच्या घरातील तीन लोक यात गुंतून पडतात. घरातील एक जण दिवसभर जनावरांसोबत छावणीत थांबतो. दुसरा रात्री थांबतो आणि या दोघांचे जेवण घेऊन जाणे आणि दूध वगैरेची ने-आण करण्यासाठीची जबाबदारी एकाला पार पाडावी लागते. छावणीऐवजी दावणीला चारा, अशी योजना राबविली तर ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताची आणि त्याला समाधान देणारी ठरेल. मराठवाड्यात ऊस लागवडीला बंदी घालण्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे विधान फडणवीस यांनी खोडून काढले. निर्बंधापेक्षाही पुढच्या तीन-चार वर्षांत उसाची लागवड ठिबकवर गेली पाहिजे, असे ते म्हणाले. परतीचा पाऊस आला तर कारखान्यांना गाळप सुरू करण्यास काहीही हरकत नाही.