शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: यंदा बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करा; प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 11:21 IST

CoronaVirus: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जयंती टाळण्याचं आवाहन

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यानं संसर्ग टाळण्यासाठी घरीच राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक जण याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.११ एप्रिलला महात्मा फुलेंची, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही जयंत्या घरातच साजऱ्या करण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 'ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण घरातच साजरी करावी, असं आवाहन मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला करतो. जयंती कशी साजरी केली त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियामार्फत दाखवता येतील. पण कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक जयंती साजरी होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे', असं आवाहन आंबेडकर यांनी केलं.राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यात कोरोनाचे साडे आठशेपेक्षा अधिक रुग्ण आहेत. यातील तब्बल ६०० हून जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. वरळी कोळीवाडा, धारावी यासारख्या लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असलेल्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यानंतर तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, केरळचा क्रमांक लागतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर