शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्डला भीक घालू नका!

By admin | Updated: August 28, 2014 03:26 IST

अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या तर त्यांना भीक घालू नका, त्यांना एकही पैसा देऊ नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या व्यावसायिक, उद्योगपतींसह बॉलीवूडला केले आहे.

मुंबई : अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या तर त्यांना भीक घालू नका, त्यांना एकही पैसा देऊ नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या व्यावसायिक, उद्योगपतींसह बॉलीवूडला केले आहे. तसेच ज्या कोणाला खंडणीसाठी धमक्या मिळतील त्यांच्या सुरक्षेची हमीही पोलिसांनी घेतली आहे.डोके वर काढू पाहणाऱ्या अंडरवर्ल्डशी दोन हात करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष अ‍ॅक्शन प्लान आखला आहे. धमक्या, गोळीबारापेक्षा प्रसिद्धीच्या जोरावर अंडरवर्ल्डमधल्या अनेक टोळयांनी आजवर आपली दहशत निर्माण केली होती. एकाला धमक्या द्यायच्या, एकाच्या घरावर बेछूट गोळीबार करायचा, माध्यमांमधील वृत्तांच्या जोरावर अनेकांवर दहशत निर्माण करायची हा अंडरवर्ल्डचा फंडा होता. मात्र अंडरवर्ल्डचे हेच अस्त्र निकामी करण्याचे मुंबई पोलिसांनी ठरवले आहे. बॉलीवूडमधील निर्माते अली मोरानी यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांची भूमिका स्पष्ट होते.मोरानी यांच्या घरावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळया झाडून पळ काढला. मात्र या घटनेची वाच्यता पोलिसांनी मुद्दामहून टाळली. त्यामुळे माध्यमे या गोळीबाराबाबत अनभिज्ञ होती. गोळीबार करवून दोन दिवस झाले तरी एकाही वर्तमानपत्रात, वृत्तवाहिनीवर बातमी नाही हे पाहून गँगस्टर रवी पुजारी कासावीस झाला. अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास त्याने स्वत:हून फोन करून मुंबईतल्या अनेकांना मोरानीच्या घरावर गोळीबार केला, अभिनेता शाहरूख खान पुढले टार्गेट असेल, अशी बोंबाबोंब सुरू केली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)