शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:34 IST

‘ती’ बैठक सिंचन प्रकल्पासाठी : जयंत पाटील यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/जळगाव : भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश द्यायचा की नाही यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात बंद दाराआड बैठक झाल्याचे समजते. मात्र ही बैठक राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या कामासाठी होती, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तर या बैठकीबाबत आपणास काहीच माहिती नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेण्यासाठी त्यांना मुंबईत बोलावण्यात आले होते. खडसे यांना पक्षात घेतले तर जळगाव जिल्ह्यात पक्ष मजबुतीसाठी त्याचा फायदा होईल, असे मुद्दे काही नेत्यांनी बैठकीत मांडले. सध्या राष्ट्रवादीकडे जळगाव जिल्ह्यात प्रभावी नेता नाही. त्यामुळे खडसे यांना घेतल्यास पक्षाला खान्देशात फायदा होऊ शकेल, अशी चर्चा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.पाटील म्हणाले की, खडसे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाने त्यांच्या नाराजीचा विचार करावा.

मी अद्याप निर्णय घेतलेला नाहीमी अद्याप निर्णय घेतलेला नाही. मला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून बोलावणे आहे. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत माझी चर्चा होत असेल तर हे मी चांगले समजतो.- एकनाथ खडसे, ज्येष्ठ नेते, भाजपखडसे यांच्या पक्षप्रवेशास कुणीही विरोध केला नाही. शरद पवार यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. आता निर्णय तेच घेतील. - अ‍ॅड. रवींद्र पाटील,जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेसनाथाभाऊ तर आमचेच हो!नाथाभाऊ हे आमचे जुने, जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीही भाजपला नुकसान होईल असा निर्णय घेणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा