DCM सुनेत्रा पवारांची इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात; ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:34 IST2026-05-19T15:33:28+5:302026-05-19T15:34:35+5:30

DCM Sunetra Ajit Pawar News: जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासह इंधन बचत ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे.

deputy cm sunetra pawar start using electric car number of vehicles in fleet also reduced | DCM सुनेत्रा पवारांची इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात; ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली

DCM सुनेत्रा पवारांची इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात; ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली

DCM Sunetra Ajit Pawar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ‘इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धन’ या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श घालून दिला आहे. 

सुनेत्रा पवार यांनी आता आपल्या दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक कारचा स्वीकार करत हरित ऊर्जा आणि स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रिक कारच्या वापरासोबतच  त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी केली आहे. 

जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासह इंधन बचत ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. छोट्या-छोट्या कृतींमधूनही मोठा बदल घडवून आणता येतो, असा संदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आपल्या कृतीतून  दिला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला राज्यातील अनेक नेते, मंत्री यांनी प्रतिसाद दिला. अनेक नेत्यांनी ईव्ही वाहनांचा वापर सुरू केला असून, ताफ्यातील वाहने कमी केली आहेत. काही नेते, आमदार प्रवास करण्यासाठी मेट्रो, रेल्वे, एसी ट्रेन अशा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत. 

 

Web Title : डीसीएम सुनेत्रा पवार ने इलेक्ट्रिक कार का उपयोग शुरू किया, बेड़े का आकार घटाया

Web Summary : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने पीएम मोदी के ईंधन संरक्षण आह्वान पर इलेक्ट्रिक कार अपनाई और बेड़ा घटाया। यह हरित ऊर्जा और जिम्मेदार नागरिकता को बढ़ावा देता है, दूसरों को पर्यावरण के अनुकूल प्रथाओं अपनाने और जीवाश्म ईंधन पर निर्भरता कम करने के लिए प्रेरित करता है।

Web Title : DCM Sunetra Pawar Starts Using Electric Car, Reduces Fleet Size

Web Summary : Deputy Chief Minister Sunetra Pawar embraced an electric car and reduced her vehicle fleet, responding to PM Modi's call for fuel conservation and environmental protection. This promotes green energy and responsible citizenship, inspiring others to adopt eco-friendly practices and reduce reliance on fossil fuels.