शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दावणीला चारा, मागेल त्याला शेततळे

By admin | Updated: September 3, 2015 01:35 IST

जनावरांच्या छावणीसोबतच दावणीला चारा देण्याचा शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच त्याची अमंलबजावणी केली जाईल. तसेच मराठवाड्यात मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असल्याचे आश्वासन

प्रताप नलावडे, बीडजनावरांच्या छावणीसोबतच दावणीला चारा देण्याचा शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच त्याची अमंलबजावणी केली जाईल. तसेच मराठवाड्यात मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौताडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुष्काळ भागाची पाहणी सौताडा येथून सुरू केली. निसर्ग कोपला असला तरी बळीराजाने संयम बाळगावा. शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहिल, असे आश्वस्तही त्यांनी केले. पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी आदी त्यांच्यासोबत होते. सौताडा गावातील महिलांनी दिवसाला केवळ दोन टँकर येत असल्याने पिण्याला सुद्धा पाणी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री तुमच्या शिवारात आले आहेत. तुमचे प्रश्न सोडवतील, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.प्रत्येकाला पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि प्रत्येक हाताला काम यासाठी योजना तयार करत असून लवकरच त्याचा जनतेला फायदा होईल. राज्यात तीन वर्षांत दीड लाख शेततळी तयार करण्यात येणार असून त्याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांचा पावसात संवादमुख्यमंत्री नायगाव परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना अचानक पावसाची सर मोठी सर आली. पावसात भिजतच फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद सुरूच ठेवला. त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने त्यांच्या डोक्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी समोर सगळे भिजत आहेत. ते दिसत नाही का, अशा शब्दांत अधिकाऱ्याला खडसावले.