शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दादर-रत्नागिरी पॅसेंजरला मिळाला ‘लेटमार्क’

By admin | Updated: June 5, 2014 01:23 IST

कोकणच्या सेवेत असणा:या गाडय़ाही आता वेळेवर धावत नसल्यामुळे त्यांची वाताहतच होत असल्याचे आता समोर येत आहे.

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात कोकणवासीयांना वाटाण्याच्या अक्षता  दाखवल्या जात असतानाच प्रत्यक्षात कोकणच्या सेवेत असणा:या गाडय़ाही आता वेळेवर धावत नसल्यामुळे त्यांची वाताहतच होत असल्याचे आता समोर येत आहे. दादर-रत्नागिरी या पॅसेंजर ट्रेनला सातत्याने लेटमार्क मिळत असून मे महिन्यात तब्बल 29 वेळा ही ट्रेन उशिराने धावल्याचे रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले आहे. या लेटमार्कमुळे या पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकातूनच सोडले जात आहे. त्याचाच मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. 
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन ही आठवडाभर धावते. दादर स्थानकातून ही ट्रेन दुपारी 1.35 वाजता सुटते आणि रत्नागिरीत त्याच दिवशी रात्री 12.50 वाजता पोहोचते. तर ही ट्रेन रत्नागिरीतून पहाटे साडेपाच वाजता सुटते आणि त्याचदिवशी दुपारी दीड र्पयत दादरला येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ट्रेनला बराच लेटमार्क मिळत असून त्यामुळे दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातूनच ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते. याबाबत रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले की, मे महिन्यात तर या ट्रेनला तब्बल 29 दिवस लेटमार्क लागले आहे. यातील तीन दिवस कोकण रेल्वेकडून तर 26 दिवस मध्य रेल्वेकडूनच लेटमार्क लागला आहे. तर फक्त दोन वेळा पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेकडून वेळेवर धावली आहे. हे पाहता मध्य रेल्वेकडूनच ट्रेन उशिराने सोडण्यात येत असल्याचे आणि तिला लेटमार्क मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेकडून 26 दिवस ही ट्रेन दीड ते साडेतीन तास उशिराने धावत राहिली असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून उपनगरीय लोकल गाडय़ांनाच प्राधान्य दिले जाते. या गाडीची वेळ पाहता ती मुंबईत आल्यावर लोकल गाडय़ांना लेटमार्क मिळू शकतो, या भीतीने पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकात शेवट करून त्याच स्थानकातून पुन्हा रत्नागिरीसाठी सोडले जात असल्याचे सांगण्यात आले. 
काही तांत्रिक समस्यांमुळे कोकण रेल्वेकडून अवघे तीन दिवस ही ट्रेन उशिराने धावली. त्यामध्ये एक ते दोन तास ट्रेन उशिराने धावल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणात लेटमार्क लागत असूनही त्यावर तोडगा न काढता कोकणवासीयांची हेळसांड करण्याचे काम केले जात आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता, ही ट्रेन कोकणकडूनच उशिराने येत असल्याने तिचा दिवा स्थानकात शेवट करीत असल्याचे सांगितले. मात्र पॅसेंजर ट्रेन उशिराने धावत असल्याने त्याची सविस्तर माहिती मागितली असता ते देऊ शकले नाहीत. 
 
तारांबळ उडते
दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातून ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते.