शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

दादा व बाबांमुळे महाराष्ट्र खड्ड्यात - गडकरी

By admin | Updated: September 28, 2014 14:15 IST

वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगार कसा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. २८ - महाराष्ट्रात वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगाराच्या नवीन संधी कशा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली आहे. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंनी प्रचाराचा नारळ फोडला. नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींनी सभा घेतली. या सभेत गडकरींनी  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील आत्तापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीका नितीन गडकरींनी केली. काँग्रेसनेच जातीयवादाचे विष कालवले असे सांगत गडकरींनी सोनिया गांधींवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात शेतक-यांनी आत्महत्या का केल्या असा सवाल गडकरींनी शरद पवार यांना विचारला आहे. आघाडीमुळेच राज्य दिवाळखोरीला निघाले असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वांना समान न्याय हेच भाजपचे सूत्र असून हिनासारख्या १०० आदिवासी मुलींनी डॉक्टर व्हावे यासाठी भाजप प्रयत्न करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.  आज दिवसभरात गडकरी उत्तर महाराष्ट्रात आणखी चार सभा घेणार आहेत. यासंपूर्ण सभेत गडकरींनी एकदाही शिवसेनेवर टीका केली नाही.