शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार; STच्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद: सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:37 IST

ST Bus NCMC Card News: प्रवाशांनी जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी , असे आवाहन करण्यात आले आहे.

ST Bus NCMC Card News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘NCMC स्मार्ट कार्ड’ उपक्रम होय. सवलत धारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या आता १ लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ही संख्या केवळ एक आकडा नसून, एसटीच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या प्रवासाची ठोस साक्ष आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

केवळ आठवड्याभरात या उपक्रमांतर्गत एकूण १,००,०२१ प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल ३७,९२७ महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत ३४,९४८ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक २४,९२७ आणि इतर प्रवासी २,२१९ अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नाही

एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून, प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

NCMC स्मार्ट कार्डची सक्ती नाही

१ मार्चपासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलत धारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि, जोपर्यंत ८०% सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंट कडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी , असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे.

भविष्यात NCMC स्मार्ट कार्डमुळे सवलत धारक प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ होणार असून, भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून, प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : ST's NCMC Smart Card Registration Surpasses 1 Lakh in a Week

Web Summary : Maharashtra ST's NCMC smart card initiative sees enthusiastic response, crossing 1 lakh registrations in a week. The scheme aims to simplify travel for concession holders, with women and senior citizens leading adoption. The card is not yet mandatory but encouraged for future ease.
टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईक