‘राधे माँ’ला कोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: October 9, 2015 01:32 IST2015-10-09T01:32:15+5:302015-10-09T01:32:15+5:30

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी उच्च न्यायालयाने मंजूर केला. हुंड्यासाठी छळवणूक केल्याचा आरोप कांदिवलीच्या एका महिलेने तिच्यावर केला आहे.

Court relief to Radhe Maa | ‘राधे माँ’ला कोर्टाचा दिलासा

‘राधे माँ’ला कोर्टाचा दिलासा

मुंबई : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी उच्च न्यायालयाने मंजूर केला. हुंड्यासाठी छळवणूक केल्याचा आरोप कांदिवलीच्या एका महिलेने तिच्यावर केला आहे.
बोरिवली पोलिसांनी ५ आॅगस्ट रोजी राधे माँविरुद्ध एफआयआर नोंदवला. राधे माँने सत्र न्यायालायात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, सत्र न्यायालयाने तिला दिलासा दिला नाही. सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध राधे माँने उच्च न्यायालायात धाव घेतली. या अर्जावरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. १४ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. त्यानंतर गुरुवारी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

Web Title: Court relief to Radhe Maa