शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus घर गाठण्यासाठी केली ४५० किमी पायपीट; विद्यार्थ्याचा वाटेतच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 5:43 AM

बालासुब्रमणी लोगेश असे त्याचे नाव असून तो तमिळनाडूतील नमक्कलचा मूळ रहिवासी आहे.

हैदराबाद : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अस्वस्थ झालेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने वर्ध्याहून निघून मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी चालत तमिळनाडूतील आपल्या घराकडे कूच केले. गेल्या दहा दिवसांच्या प्रवासात सुमारे ४५० किमी अंतर पार केल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन हा विद्यार्थी बुधवारी रात्री वाटेतच मरण पावला.

बालासुब्रमणी लोगेश असे त्याचे नाव असून तो तमिळनाडूतील नमक्कलचा मूळ रहिवासी आहे. कृषी उत्पादनाशी संबंधित एका प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तो वर्धा येथे आला होता. २१ दिवसांच्या टाळेबंदीमुळे त्याने एका गटाबरोबर मजल दरमजल करीत घर गाठण्याचे ठरविले. दहा दिवसांच्या प्रवासानंतर हा गट तेलंगणातील बोवेनपल्ली येथे पोहोचला असता तेथील बाजारपेठेत पोलिसांनी बुधवारी दुपारी त्यांना अडविले. या साऱ्या लोकांची रवानगी एका हॉलमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात करण्यात आली. त्यांना जेवणही देण्यात आले. कोरोनाच्या साथीमुळे संचारबंदी लागू असून तुम्हाला पुढच्या प्रवासाला जाता येणार नाही, असे पोलिसांनी या लोकांना बजावले.या निवारा केंद्रात बुधवारी रात्री बालासुब्रमणी लोगेश याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

निर्धार ठरला जीवघेणावर्ध्याहून निघालेल्या बालासुब्रमणी व त्याच्या सोबतच्या लोकांनी जीवनावश्यक वस्तू बरोबर बाळगून प्रवासाला सुरुवात केली होती. ट्रक किंवा मिळेल त्या वाहनाने ते प्रवास करत होते. प्रसंगी पायी चालत अंतर कापत होते. हा प्रवास व घरी पोहोचण्याचा निर्धार ज्याच्यासाठी जीवघेणा ठरला. बालासुब्रमणी याचा मृतदेह शववाहिनीतून तमिळनाडूला त्याच्या गावी रवाना करण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस