शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

CoronaVirus News: फडणवीस, उद्याच तुमच्या आकडेवारीची चिरफाड करू; ठाकरेंचा 'खास माणूस' अ‍ॅक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 8:37 PM

CoronaVirus News: राज्यात केवळ आपल्यालाच अर्थगणित कळतं असं फडणवीसांना वाटतं; शिवसेना मंत्र्याचा हल्लाबोल

मुंबई: बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले अनिल परब पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. ठाकरे सरकारवर होणाऱ्या हल्ल्यांना खासदार संजय राऊत एकटे तोंड देत असताना परब यांनी पहिल्यांदाच विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून आलेली मदत आणि राज्य सरकारला दिलेले सल्ले यावरून परब यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यात फक्त तुम्हालाच अर्थगणित कळत नाही, असं म्हणत परब फडणवीसांवर बसरले.'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला मोठे आर्थिक सल्ले दिलेले आहेत. राज्य सरकारनं काय करायला हवं, कशी उपाययोजना करायला पाहिजे, याबद्दलचं फार मोठं मार्गदर्शन त्यांनी महाराष्ट्राला केलं आहे. परंतु हे करत असताना त्यांनी हा विचार करायला हवा की महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळतं असं नाही. सरकारमध्ये बसलेले अनेक जण अर्थशास्त्र जाणतात,' अशा शब्दांमध्ये अनिल परब यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला. राज्याला केंद्रानं पूर्ण सहकार्य केलं असून भरीव मदत दिली आहे, असं म्हणत फडणवीस यांनी मोठीच्या मोठी यादीच वाचून दाखवली. त्या आकडेवारीची पोलखोल उद्याच केली जाईल, असंदेखील परब म्हणाले. महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं काम करतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अहोरात्र कष्ट करून सर्व तज्ज्ञांशी बोलून कोरोना संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल, सविस्तर चिरफाड अतिशय सोप्या भाषेत उद्या राज्यातल्या जनतेसाठी सरकारच्या वतीनं करण्यात येईल, असं परब म्हणाले.सरकार कसं चालवायचं, सरकार कसं चालतं, त्यासाठी काय करावं लागतं, याची जाणीव महाराष्ट्र सरकारला आहे. परंतु फडणवीस यांनी जे काही विषय आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडले. त्यात सगळं काही आपल्यालाच कळतं असा त्यांचा आविर्भाव होता. जे काही समजतंय ते आम्हालाच समजतंय आणि आमच्याच सल्ल्यानं सरकार चाललं, तरच सरकार चालू शकेल आणि महाराष्ट्राची जनता कोरोनामुक्त होईल. अन्यथा महाराष्ट्र फार मोठ्या संकटात सापडेल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात!केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Parabअनिल परबUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत