शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया-  उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:08 IST

विद्यार्थ्यांनी  काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

मुंबई- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणीसाठी ऑनलाइन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज 'वर्क फ्रॉम होम'  या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. हे ऑनलाईन कामकाज पूर्ण करण्यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाचे संचालक, डॉ.अभय वाघ हे व्हॉट्सऍप समूहावर मार्गदर्शन करीत आहेत.

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने माहिती पुरविणे तसेच पाठ्यक्रमानुसार व्हिडीओ तयार करून ते इमेल, व्हॉट्सऍपद्वारे उपलब्ध करून देणे, याचबरोबर ऑनलाइन संसाधनांचा (SWAYAM, NEAT, COURSERA , edX etc ) अध्ययनासाठी स्वतः प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वापर करणे , Screen -o-matic सारख्या ऑनलाइन व्हिडीओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्राध्यापकांनी विषय निहाय व्हिडीओ क्लिप तयार करून विद्यार्थ्यांना पुरविणे , व्हॉट्सऍप समूहाद्वारे नेमवून दिलेले कार्य (Assignment) पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निरसण करणे, पुढील सत्राचे शैक्षणिक नियोजन विभागास सादर करणे, प्रश्नावलीची बँक तयार करणे, असे अनेक ऑनलाइन पर्याय  उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाइन वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे आवाहनही सामंत यांनी केले आहे. 

पुढील टप्प्यात  सर्व संस्थांचा आढावा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. सर्व संस्था व प्राध्यापक यांना गुगल फॉर्म पाठवून त्यांनी वर्क फ्रॉम होम करताना वरीलपैकी कोणकोणते पर्याय वापरले, त्यांची परिणामकारकता काय, किती विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला याबाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक आणि संबंधित संस्थेचे प्राचार्य यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांमधील प्राध्यापकपदांना ७ वा वेतन आयोग लागू करताना शासनाने प्राध्यापकांची कामगिरी तपासण्यासाठी ३६० डिग्री फीडबॅक संकल्पना अनिवार्य केली आहे. यात प्राध्यापक वर्गाचे वार्षिक गोपनीय अहवाल, आणि '३६० डिग्री फीडबॅक' या बाबींचे मूल्यमापन करताना त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' अंतर्गत केलेल्या कार्याचा मूल्यमापनाच्या दृष्टीने समावेश असेल अशा पद्धतीने आधुनिक तंत्रावर आधारित अध्यापन पद्धतींचा वापर करून या लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे महत्त्वपूर्ण कार्यालयीन कामकाज विशेषतः मार्च अखेरची आर्थिक बाबींविषयक कामे सुद्धा दूरध्वनी, इमेल, व्हॉट्सअप च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत, असेही  सामंत यांनी संगितले.                             

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या