शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्यात आठवडाभरात काेराेनाचे २ हजारांहून अधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:20 IST

CoronaVirus News: राज्यात २ ऑक्टाेबर रोजी काेराेनाच्या तीव्र संक्रमणकाळात २४ तासांत ४२४, अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ८ एप्रिलला दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबई : राज्यात दिवसागणिक    काेराेना संसर्गाचा विळखा घट्ट होत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवडाभरात काेराेनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. या कालावधीत राज्यात २ हजार १०० कोरोनाबळींची नोंद झाली.राज्यात २ ऑक्टाेबर रोजी काेराेनाच्या तीव्र संक्रमणकाळात २४ तासांत ४२४, अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ८ एप्रिलला दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ११,९७५ बाधितांना जीव गमवावा लागला. राज्याच्या मासिक मृत्यूदराचे प्रमाण फेब्रुवारीत ०.८ टक्का होते. मार्च महिन्यात ते ०.४ टक्क्यावर आले. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवडाभरात ०.५ टक्क्यावर पोहोचले. दिवसाला २ लाख कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित म्हणाले, कोरोना मृत्यूंचे प्रमाण राज्यात हळूहळू वाढते आहे. यामागे उशिराने होणारे निदान, खाटांचा अभाव, सहवासितांचा शोध घेण्यास कमतरता, ही कारणे असू शकतात. मात्र, आता टास्क फोर्सच्या मदतीने वेळोवेळी  सल्लामसलत सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य हाेईल.

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घटपालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत दैनंदिन रुग्णांत १५ टक्क्यांची घट झाली. १० हजार रुग्णांची नोंद काही दिवसांपूर्वी सलग होत होती, ती आता ८,९३८ वर आली आहे. केंद्राकडून मुंबईत आलेल्या विशेष पथकाने येथील विलगीकरण व्यवस्था, लसीकरणाचे व्यवस्थापन उत्तम असल्याचे सांगितले. मुंबईत दिवसभरात ४९ हजार चाचण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस