शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात २४ तासांत ५५ हजार ४११ रुग्ण तर ३०९ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:06 IST

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात दिवसभरात ५३ हजार ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २७ लाख ४८ हजार १५३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मुंबई :  राज्यात शनिवारी ५५ हजार ४११ रुग्ण आणि ३०९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१ झाली असून मृतांचा आकडा ५७ हजार ६३८ झाला आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ३६ हजार ६८२ आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ५३ हजार ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २७ लाख ४८ हजार १५३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१८ टक्के झाले असून मृत्यूदर १.७२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी १८ लाख ५१ हजार २३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३० लाख ४१ हजार ८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २५ हजार २९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३०९ मृत्यूंपैकी १७६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ६० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ३०९ मृत्यूंमध्ये मुंबई २८, ठाणे २, ठाणे मनपा १६, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ८, उल्हासनगर मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा २८, नाशिक ८, नाशिक मनपा १६, मालेगाव मनपा १, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा २, जळगाव ५, नंदूरबार १, पुणे ४, पुणे मनपा ९, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ३, सोलापूर मनपा ५, सातारा ३, कोल्हापूर मनपा १, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, रत्नागिरी ३, जालना ७, हिंगोली १, परभणी ४, परभणी मनपा २, लातूर ५, लातूर मनपा २, उस्मानाबाद ६, बीड ५, नांदेड १४, नांदेड मनपा १४, अकोला मनपा ६, अमरावती ३, अमरावती मनपा ३, बुलढाणा ३, वाशिम ३, नागपूर २१, नागपूर मनपा २२, वर्धा २, भंडारा २, गोंदिया ७, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा ३, गडचिरोली ८ इ. रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस