शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News : साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 7:25 PM

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली.

- प्रमोद सुकरे

कऱ्हाड : ‘कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा,’ अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या.

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना वरील सूचना केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील यांची उपस्थिती होती.

शरद पवार व्यासपीठावर असणाऱ्या साखर कारखानदारांकडे पाहूनच म्हणाले की, ‘कारखानदारांना हॉस्पिटल उभारणे काही अवघड बाब नाही. त्यांनी मनात घेतले, अद्ययावत हॉस्पिटल उभारली तर रुग्णांना चांगली सुविधा मिळणे सोपे होईल. जे साखर कारखाने बंद आहेत. त्या कारखान्यांची रिकामी गोडावून उभारलेली मोठी पत्र्याची शेडसुद्धा ताब्यात घेऊन ठेवली पाहिजेत. तेथे सुद्धा कोरोना क्वॉरंटाईन सेंटर उभारता येतील. याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी.’

मी अजूनही चेअरमन आहेकारखानदारांनी हॉस्पिटल उभारावीत ही सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना करताना शरद पवार यांनी ‘बाळासाहेब तुम्ही सद्धा एका कारखान्याचे चेअरमन होता’ असा उल्लेख केला. त्यावर ‘साहेब मी अजूनही चेअरमन आहे,’ असे बाळासाहेबांनी सांगताच बैठकीत खसखस पिकली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSatara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने