Coronavirus: सरकारचा घरमालक अन् सोसायटींना इशारा; डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांशी ‘असं’ वागाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:32 PM2020-03-26T13:32:03+5:302020-03-26T13:34:37+5:30

घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे.

Coronavirus: Cooperate with doctors, health workers otherwise take action agaisnt Society Warns by Government pnm | Coronavirus: सरकारचा घरमालक अन् सोसायटींना इशारा; डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांशी ‘असं’ वागाल तर...

Coronavirus: सरकारचा घरमालक अन् सोसायटींना इशारा; डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांशी ‘असं’ वागाल तर...

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलेडॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाहीघरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे.

मुंबई : राज्यात काही ठिकाणी डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच परंतु नियमबाह्यही आहे अशा शब्दात राज्य सरकारने बजावलं आहे.

घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असं शासनाने प्रसिद्धी पत्रक काढून इशारा दिला आहे.सध्या कोरोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे असं त्यांनी पत्रकात सांगितले आहे.

त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असं असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधित घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं बजावण्यात आलं आहे.

भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. मुंबईत 1आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. काल पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus: Cooperate with doctors, health workers otherwise take action agaisnt Society Warns by Government pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.