शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: ५ कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्याने काढली जागतिक निविदा; प्रत्यक्षात खरेदीमध्ये मात्र अडचणींचा डोंगरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 05:35 IST

केंद्राकडून आयातीची परवानगी, मुंबई महापालिकेने अलिकडेच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली पण तिला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेची मुदत वाढवून देण्याची वेळ महापालिकेवर आलेली असताना आता राज्य शासनाने निविदा काढली.

मुंबई : पाच कोटी कोरोना प्रतिबंधक लसींच्या खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. केंद्र सरकारने राज्यांना या लशींच्या आयातीची परवानगी दिल्यानंतर राज्य शासनाने हे पाऊल उचलले आहे.

अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लस उत्पादक कंपन्यांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच लस खरेदीसाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य असेल, असेही म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने अलिकडेच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली पण तिला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेची मुदत वाढवून देण्याची वेळ महापालिकेवर आलेली असताना आता राज्य शासनाने निविदा काढली. भारतातील कंपन्यांकडून महाराष्ट्राला ज्या दरात लस मिळतील त्या मानाने देशाबाहेरील कंपन्यांच्या लशींचे दर कितीतरी अधिक आहेत. त्यामुळे विदेशी कंपन्यांकडून लस खरेदी करणे राज्य शासनाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे जागतिक निविदा हा केवळ सोपस्कार ठरण्याची शक्यता आहे.

भारताबाहेरील लस उत्पादक कंपन्यांकडे आज लसींसाठी जगभरातून मागणी आहे. अशावेळी एकट्या महाराष्ट्राला पाच कोटी लसींचा पुरवठा करण्यासाठी कंपन्या समोर येतील का, या बाबतही साशंकता आहे. केंद्र सरकारने लस आयातीची परवानगी दिली खरी मात्र कस्टम ड्युटी, वाहतूक हा खर्च जर राज्य शासनाला करावा लागला तर किमतीचा बोजा अधिकच वाढणार आहे. 

केंद्राने केली स्वत:ची सुटका राज्यांना लसींच्या आयातीची परवानगी देऊन केंद्र परवानगी देत नसल्याच्या टीकेतून केंद्र सरकारने स्वत:ची सुटका करवून घेतली आहे. त्याचवेळी लस खरेदीसाठी आम्ही प्रसंगी जागतिक निविदा काढण्यासही मागेपुढे पाहिले नाही, असे दाखविण्याची संधी या निमित्ताने राज्य शासनाला मिळाली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या