शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

कार्नेल युनिव्हर्सिटीचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मुंबईत; नवीन चार हजार स्टार्ट अप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 18:06 IST

मुख्यमंत्री रोजगार योजनेतून पाच हजार युनिटला मंजुरी

पुणे : राज्यातील स्टार्टअपच्या व्यावसायिक गुणवत्ता वाढीसाठी अमेरिकेच्या कार्नेल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या विद्यापीठाचे उद्योगविषयक  ‘इनक्युबेशन सेंटर’ मार्च-एप्रिलपर्यंत मुंबईत सुरु केले जाणार आहे. याठिकाणी प्रशिक्षणासोबतच व्हेंचर कॅपिटल फंड देण्याचीही सुविधा निर्माण केली जाणार आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरणार असल्याची माहिती उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्षाच्या (मैत्री) पुणे विभागाच्या व्हर्चुअल सुविधा कक्षाचे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कांबळे म्हणाले, राज्यातील नवीन स्टार्ट अपसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण ठरलेले असून आतापर्यंत चार हजार स्टार्ट अप सुरु झाले आहेत. कार्नेल विद्यापीठासोबत सुरु केल्या जाणा-या सेंटरमध्ये फक्त महाराष्ट्रातीलच 60 ते 70 स्टार्टअपला प्रवेश दिला जाणार असून यामध्ये 30 टक्के जागा महिला उद्योजकांसाठी राखीव असणार आहेत. या सर्वांचे शुल्क शासनाचा उद्योग विभाग भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.====आतापर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजनेमधून पाच हजार युनिट मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेला राज्यातील नवउद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा स्तरावर तसेच राज्य स्तरावर विविध बँकांच्या अधिका-यांसोबत बैठका घेण्यात येत असून त्यांनाही अधिकाधिक प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे कांबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे