शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 3:00 PM

काँग्रेसनेही कंगनावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली. याच दरम्यान काँग्रेसनेही कंगनावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. "कोणी पूर्वीचा अट्टल ड्रग अ‍ॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतंय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतंय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

 सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. भाजपा समर्थन करते?, तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपचेच आहेत असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच "काल भाजपा संचालित एक चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. #महाराष्ट्रद्रोही भाजपला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!" असं देखील  सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीबआयने म्हटलं. यावरून सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर निशाणा साधला होता. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत त्यांनी एक ट्विट केलं होतं. 'भाजपाचं तोंड काळ होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर करण्याचं पाप भाजपाला खूप महागात पडणार आहे,' असं सचिन सावंत यांनी म्हटलं होतं.  त्यानंतर आता कंगणावरून भाजपावर निशाणा साधला आहे. 

कंगनाने शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेला पुन्हा डिवचले 

कंगनाने मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यालयाला भेट देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिले होते. त्यानंतर बुधवारी रात्री कंगनाने शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा डिवचले आहे. मला समोरून नोटिस देण्याची आणि समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही, असा टोला कंगना राणौत हिने लगावला आहे. कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. 

आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल

महापालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना राणौतने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल, काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो, असे सांगतानाच बॉलिवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप कंगनाने केला. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! एका महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नोकरी गेल्याने दाम्पत्याची आत्महत्या

"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसKangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाPOK - pak occupied kashmirपीओकेBJPभाजपा