मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:48 AM2020-09-10T11:48:37+5:302020-09-10T11:59:16+5:30

गुगलने एक खास फीचर आणलं आहे. गुगलकडून Verified Calls फीचरची घोषणा करण्यात आली आहे.

google announces truecaller app like verified calls feature | मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

googlenewsNext

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता गुगलने एक खास फीचर आणलं आहे. गुगलकडून Verified Calls फीचरची घोषणा करण्यात आली आहे. Google Phone अ‍ॅप्सचा हा एक भाग आहे. यामुळे तुम्हाला कोण कॉल करतंय याबाबतची माहिती मिळणार आहे. 

कॉल फ्रॉड्सवर लगाम लावणं हा गुगलच्या या खास फीचरमागचा मुख्य उद्देश आहे. भारतासह जगभरात फ्रॉड कॉल्स ही मोठी समस्या आहे. तसेच Verified Calls फीचर रोलआउट करण्यासोबतच युजर्सचा यापासून बचाव होणार आहे. बिझनेस कॉलमध्ये युजर्सला कोण आणि का कॉल करत आहे हे दिसणार आहे. भारत, स्पेन, ब्राझील मेक्सिको आणि यूएससह जगभरात हे फीचर रोलआऊट केले जात आहे.

बिझनेस कॉल करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार 

सध्या TrueCaller हे अ‍ॅप युजर्सना असे फंक्शन देत आहे. Google Phone अ‍ॅपमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा एक भाग बनणार आहे. म्हणजेच वेगळं कोणतंही अ‍ॅप यासाठी खास डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. Verified Calls ही TrueCaller अ‍ॅपसारखं काम करणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने दिलेल्या माहितीनुसार, पायलट प्रोग्रॅमच्या सुरुवातीला रिझल्ट्स खूप चांगले राहिले आहे. युजर्संना याचा फायदा नक्की मिळेल.

गुगलच्या पिक्सल सीरीज शिवाय खूप अँड्रॉईड फोन्समध्ये डिफॉल्ट Google Phone अ‍ॅप हेच डायलरचे काम करीत असतात. या सर्व फोन्समध्ये नवीन फीचर अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये Google Phone अ‍ॅप इन्स्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इंस्टॉल करता येते. गुगलचे हे नवीन फीचर्स युजर्संना बिझनेस कॉल करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार आहे. TrueCaller मध्ये हे फीचर अद्याप उपलब्ध नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने गुगल प्ले स्टोरवर असलेले सहा धोकादायक मेलवेयर असलेले अ‍ॅप्स शोधून काढले आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा हे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात आले आहे. सायबर सिक्योरिटी फर्म Pradeo च्या रिपोर्टनुसार, या सहा अ‍ॅप्समध्ये कनवीनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी अ‍ॅपलॉक, पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सॅपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्सचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहे. मात्र तुमच्या फोनमध्ये असल्यास लगेचच डिलीट करा. 

महत्त्वाच्या बातम्या

तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी

भारीच! मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत अभियाना'मुळे बदललं तरुणाचं नशीब, महिन्याला लाखोंची कमाई

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता", काँग्रेसचं टीकास्त्र

CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य

 

Web Title: google announces truecaller app like verified calls feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.