"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:38 PM2020-09-10T12:38:52+5:302020-09-10T12:49:16+5:30

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

rahul gandhi attacks on centra said modi government have caused the loss of crores | "मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. "मोदी सरकारच्या नीतींमुळे देशातील करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे. भारतीय तरुणांचं भविष्यच पायदळी तुडवलं गेलंय. या, आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवूया' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या स्पिक अप मोहिमेत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं म्हटलं आहे. "अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. 21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन दिलं होतं पण कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग संपवण्यात आले" असं ही राहुल यांनी म्हटलं आहे. 

"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"

"कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटीत क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. छोट्या आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाऊन केलं तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं.पंतप्रधानांनी  21 दिवसांची लढाई असेल असं सांगितलं होतं पण असंघटीत क्षेत्राचा 21 दिवसांत कणाच तुटला. लॉकडाऊननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण तसं नाही केलं."

सरकारने सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला

"सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना वाचवण्याची गरज आहे. या पैशाशिवाय हे उद्योग नाही जगणार. सरकारे काहीच केलं नाही. उलट सरकारने सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला. लॉकडाऊन कोरोनावर आक्रमण नव्हतं. लॉकडाऊन देशातील गरिबांवरील आक्रमण होतं. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होतं. लॉकडाउन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होतं. आपल्या असंघटीत अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल. या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी

भारीच! मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत अभियाना'मुळे बदललं तरुणाचं नशीब, महिन्याला लाखोंची कमाई

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता", काँग्रेसचं टीकास्त्र

Web Title: rahul gandhi attacks on centra said modi government have caused the loss of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.