"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 08:43 AM2020-09-10T08:43:31+5:302020-09-10T10:41:27+5:30

सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे.

congress leader adhir ranjan chowdhury attacks on bjp in sushant singh rajput death case | "निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र

Next

नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर निशाणा साधला आहे. याबाबत एक ट्विट केलं आहे. "सुशांतसिंह राजपूत हा देशाचा अभिनेता होता. मात्र भाजपाने निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकलं" असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडीलही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्यास पात्र आहेत, सर्वांसाठी न्याय हे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. रियाचे वडील हे निवृत्त लष्करी अधिकारी असून त्यांनी देशाची सेवा केली असं देखील चौधरी यांनी म्हटलं आहे. 

"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून भाजपावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं आहे. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या काही बातम्या व भाजपाच्या निवडणूक प्रचाराचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी या राजकारणाचा पुरावाच दिला आहे. तसेच बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं देखील म्हटलं आहे. "सुशांतसिंह राजपूत याच्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा अजेंडा आहे. पण या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत" असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. 

बिहारमध्ये ना भुले है! ना भुलने देंगे! असं लिहिलेले स्टीकर्स 

भाजपाच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले 30 हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे व राजकारणाचा विषय झाला आहे. या तपासाच्या मुद्यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्रातील सरकार असाही संघर्ष झाला होता.

रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. रियाला एनसीबीकडून अटक झाली आणि व्हर्च्युअल सुनावणीच्या माध्यमातून एनसीबीने मागितल्याप्रमाणे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाला जामीन मिळवून देण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य

CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा

"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"

दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन 

"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान

Web Title: congress leader adhir ranjan chowdhury attacks on bjp in sushant singh rajput death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.