शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

नव्या प्रभाग पद्धतीला काँग्रेसचा विरोध; दोन सदस्यीय प्रभाग करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 06:55 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्याला विरोध आहे. 

मुंबई : आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या  निर्णयाला प्रदेश काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा, असा ठराव प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला.  मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसचेही मंत्री उपस्थित होते. त्यांच्या सहमतीने निर्णय झालेला असताना प्रदेश काँग्रेसने असा ठराव करून स्वतःच्या सरकारपुढे प्रश्न निर्माण केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्याला विरोध आहे. 

त्यामुळे तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासंबंधीचा ठरावही कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

काय साध्य करायचेय? ज्येष्ठ नेत्याचा सवाल- मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार होता हे काँग्रेस नेत्यांना माहिती होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यावर काही भाष्य केले नाही. - हा निर्णय होऊ दिला आणि आता वेगळा ठराव करून प्रदेश काँग्रेस समितीला काय साध्य करायचे आहे? अशाने स्वतःच्या सरकारपुढे आपण स्वतः प्रश्न निर्माण करत आहोत. - मात्र आमचे नेते स्वतःच्या हिताच्या राजकारणाशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत अशी उद्विग्न प्रतिक्रिया काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरे