Congress Leader Nana Patole letter to the Chief Minister and demand for the door to door Corona Vaccination | CoronaVirus : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा! नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा! नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशांतील लसीकरणांवरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. १ मेनंतर तर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम’ राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. यात, "कोरोनावर मात करण्यासाठी आपली यंत्रणा सर्व पातळ्यांवर काम करत आहे. मात्र, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच जगभरात प्रभावी शस्त्र ठरलेले आहे. इस्रायल सारख्या छोट्या देशाने ते करून दाखवले आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर देशांनीही लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रानेही देशात लसीकरणात मोठी आघाडी घेऊन १ कोटींपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. ही लसीकरण मोहीम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल. पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात अशीच मोहिम राबवण्यात आली होती. याचधर्तीवर घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश मिळेल, असे पटोले यांनी म्हटले आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

कोरोना महामारीने मानवजातीसमोरच गंभीर संकट उभे ठाकले असून दुसऱ्या लाटेत संक्रमण मोठ्या वेगाने होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पसरलेले हे संक्रमण आता गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात पोहचले आहे. वर्षभरापासून आपण या संकटाचा सामना करत आहोत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसीवीर, ऑक्सीजनअभावी दररोज लोकांचे जीव जात आहेत हे भयानक चित्र पहावत नाही. एकीकडे जीवितहानी होत असताना अर्थचक्रही सुरुळीत चालण्यात अडथळे येत आहेत. कोरोनामुळे वर्षभरात सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची आग्रही मागणी राहिली आहे. काँग्रेसच्या मागणीचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असेही नाना पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

Read in English

English summary :
Coronavirus in Maharashtra : Congress Leader Nana Patole letter to the Chief Minister and demand for the door to door Corona Vaccination

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress Leader Nana Patole letter to the Chief Minister and demand for the door to door Corona Vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.