शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:18 IST

Congress Balasaheb Thorat News: बाळासाहेब थोरात यांनी संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली.

Congress Balasaheb Thorat News: अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीचे चरणी प्रार्थना केली की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि  संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांची ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्त प्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी त्यांनी यावेळी केली. 

माध्यमांशी बोलताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक टीका केली. ते म्हणाले, या पाषाण हृदयी सरकारला काही केल्या पान्हा फुटत नाही. शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत, तरीही त्यांची वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाही. केवळ आकडेवारीचा खेळ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता येणार नाहीत. थोरात पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मी आज सकाळी संभाजीनगर जिल्ह्यात पाहणीला सुरुवात केली आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या.  

मोहटादेवी हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यांमधील शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाला आहे. मी सकाळपासून छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) आणि अहिल्यानगर येथील अनेक गावांतील शेतकऱ्यांना भेटलो. त्या सर्वांची व्यथा अनुभवल्यानंतर, मी मोहटादेवीला प्रार्थना करतोय की, या संकटातून शेतकऱ्यांना वाचव. केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे. दुर्दैवाने शेतकरी मोठ्या संकटात आहे. खूप नुकसान झाले आहे. जमिनी वाहून गेल्या आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्यांना लक्ष्मी मानतो त्या गुराढोरांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा संकटात सरकार कोठे आहेत, असा प्रश्न पडतो आहे. मंत्री येतात आणि जातात, काही बोलत नाहीत, उत्तरे देत नाहीत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही म्हणून देवीचरणी प्रार्थना आहे की अशा नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी बांधवांना ताकद दे आणि या राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची सुबुद्धी दे अशी प्रार्थना बाळासाहेब थोरात यांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thorat Prays for Farmers, Urges Government Wisdom After Crop Loss

Web Summary : Balasaheb Thorat visited rain-affected farms, praying for farmers' strength. He criticized the government's inadequate response to widespread crop damage and urged them to provide meaningful support to struggling farmers. Thorat appealed for empathy and action.
टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAhilyanagarअहिल्यानगर