शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 20:54 IST

मराठा आरक्षणाकरिताच्या न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली..

ठळक मुद्देकोरोना संसर्गात पुणे क्रमांक एकवर असणे हे क्लेशदायीशिवसेनेने मुंबईची तुंबई करुन दाखवली

पुणे : मराठा समाजाला राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांच्या ज्या सवलती देऊ केल्या आहेत, त्या सवलती म्हणजे मराठा समाजाचा उद्रेक व असंतोष क्षमविण्यासाठी आम्ही काही तरी करत आहोत, हे दाखविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.    नाबार्डच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतल्यानंतर दरेकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजासाठी भरिव आर्थिक तरतूद करण्याऐवजी महामंडळांसाठी केलेल्या तरतूदी म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. ज्या सवलती दिल्या आहेत त्या केवळ दिखावा असून, यातून समाजाच्या हातात काहीही येणार नाही. ओबीसींचे आरक्षण आम्हाला नको आहे. फडणवीस यांनी दिलेले स्वतंत्र आरक्षण आम्हाला हवे असून, सगळ्यांना सामान न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. तसेच मराठा आरक्षणाकरिताच्या न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचे ते म्हणाले.     कोरोना संसर्गात पुणे क्रमांक एकवर असणे हे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी असल्याने आम्ही सांगितलेल्या उपाययोजना केल्या जात नाहीत. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम सरकार करत असून, कोरोना आपत्तीत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 

आम्ही करुन दाखवलं' अशा आशयाची मोठमोठी होर्डिंग्स शिवसेनेनी मुंबईत लावली. या होर्डिंग्जप्रमाणे त्यांनी खरोखरच करुन दाखवले आणि मुंबईची तुंबई झाली. आता याची जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे. मुंबई महापालिकेकडे पैशाची कमी नसल्याने ते मुंबईसाठी पाहिजे ती मशिनरी घेऊ शकतात. पण असे असतानाही मुंबईकर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील तर तीस-चाळीस वर्षे पालिकेत तुम्ही सत्ता उपभोगून काय केले, हा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. -------------------कंगना रानौत यांचीही चौकशी व्हावी     कंगना रानौत ड्रगिस्ट असल्याचे बोलले जात असेल, तर तिचीही चौकशी झाली पाहिजे. आपल्या वैभवशाली चित्रपट सृष्टीत नवोदित कलाकार येणार असतील व त्यांना ड्रग्जचे व्यसन जडणार असल्याची शक्यता असल्यास कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही, असे दरेकर यांनी सांगून, ड्रग्जचे व्यसन हे फिल्म इंडस्ट्रीच्या हिताचे नाही. कंगना ड्रग्ज घेत असेल, ड्रगिस्ट असेल तर तिचा संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून तिची चौकशी व्हावी. कंगना थोडी या देशाची वेगळी नागरिक आहे, सगळ्यांना न्याय तोच कंगनाला न्याय. कायदा हा आपल्या देशात सर्वांना सारखा असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPraveen Darekarप्रवीण दरेकरState Governmentराज्य सरकारMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस