शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:28 IST

दिल्ली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या जसीर बिलाल वानी याच्या कोठडीत आता आणखी ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीत झालेल्या कारस्फोटाने अवघ्या देश हादरवून सोडला. या स्फोटात तब्बल १५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या जसीर बिलाल वानी याच्या कोठडीत आता आणखी ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. जसीर बिलाल सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. २७ नोव्हेंबर रोजी अटक झाल्यानंतर जसीर बिलाल वानीला, प्रधान स्तर आणि जिल्हा न्यायाधीश अंजु बजाज चंदना यांच्या न्यायालयाने  ७ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले होते. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी असलेल्या जसीर वानीवर अतिशय गंभीर आरोप आहेत. 

जसीर बिलाल वानी याने दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या आधी ड्रोनमध्ये काही तांत्रिक बदल करून त्यात स्फोटके लपवून स्फोट घडवण्याची योजना आखली होती. इतकंच नाही, तर त्याने रॉकेट बनवण्यामध्ये व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलला तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप देखील जसीर वानी याच्यावर आहे. देशात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये देखील जसीर बिलाल वानी याचे नाव समोर आले आहे. अनेक देशघातकी कटांमध्ये तो सामील होता. दिल्ली कार स्फोट प्रकरणात आतापर्यंत ७ लोकांना अटक करण्यात आली आहे.

एनआयएने जसीर हा दिल्ली कार स्फोट घडवून आणणाऱ्या डॉ. उमर याचा जवळचा सहकारी असल्याचे म्हटले आहे. डॉ. उमर उन नबी याच्यासोबत जसीर बिलाल यानेही या हल्ल्याची योजना तयार केली होती. एनआयएने १७ नोव्हेंबर रोजी जसीर बिलाल वानी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक केली होती. 

त्याने चौकशीदरम्यान सांगितले की, लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट घडवणारा बॉम्बर डॉ. उमर याने त्याचे अनेक महिने ब्रेनवॉशिंग केले होते. डॉ. उमरने जसीर बिलाल वानीला आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या वर्षी एप्रिलमध्ये जसीर बिलाल वाणीने इस्लाममध्ये आत्महत्या निषिद्ध असल्याचे कारण देत आत्मघाती बॉम्बर बनण्यास नकार दिल्याने डॉ. उमरचे प्रयत्न हाणून पाडले गेले.      

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Car Blast: Key Accused Jasir's Custody Extended for Investigation

Web Summary : Jasir Bilal Wani's custody extended by 7 days in Delhi car blast case. NIA to further investigate his involvement in terror plots, including providing technical support for drone modifications and rocket making. He is accused of being a close associate of Dr. Umar, the mastermind.
टॅग्स :delhiदिल्लीcarकारBlastस्फोट