‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला

By Admin | Updated: October 1, 2016 19:48 IST2016-10-01T19:48:57+5:302016-10-01T19:48:57+5:30

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

CM's medical assistance speed up | ‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला

‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १ -  देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. २२ महिन्यांत विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना थोडीथोडकी नव्हे तर ८० कोटींहून अधिक रुपयांची मदत झाली आहे. या वर्षी एप्रिलपासून तर मदतीचे प्रमाण आणखी वाढले असून ५ महिन्यांतच ४५ कोटींहून अधिक निधीचे वाटप झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. 
मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ जुलै २०१६ या १९ महिन्यांच्या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय मदत मिळावी यासाठी १२ हजार ५४९ नागरिकांचे अर्ज आले. कागदपत्रांची पूर्तता करणाºया अर्जदारांना मदतीचे वाटप करण्यात आले. १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ आॅगस्ट २०१६ या काळात अर्जदारांना ८३ कोटी ६ लाख १८ हजार ३४० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. 
तर नैसर्गिक आपत्ती बाधितांचे पुनर्वसन व अपघाती मृत्यू प्रकरणांत २२ कोटी ७६ लाख ४२ हजार ५९ रुपयांची मदत करण्यात आली. एप्रिल २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३०२ कोटी ८४ लाख ५९ हजार ७९४ रुपयांचा निधी जमा होता. 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीबाबतचा अर्ज कधीही नाकारण्यात येत नाही, ही बाब या माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. अर्जासोबत प्राप्त झालेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. जर कागदपत्रांत काही त्रुटी असतील तर तसे अर्जदारांना कळविण्यात येते. आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर मदत पुरविण्यात येते, असे सचिवालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
 

Web Title: CM's medical assistance speed up