शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
4
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
5
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
6
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
7
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
8
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
9
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
10
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
11
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
12
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
13
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
14
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
15
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
16
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
17
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
18
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
19
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
20
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ठाकरेंचा आणखी एक धक्का; फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 06:54 IST

अपूर्ण कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार

मुंबई : जलयुक्त शिवार अभियानाला अखेर पूर्णविराम लागला आहे. या अभियानांतर्गत अपूर्ण असलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येतील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात सांगितले.जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१८-१९ हे शेवटचे वर्ष होते. मागील सरकारने या अभियानाला ३१ डिसेंबर १९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडाख यांनी स्पष्ट केले. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेस मुदतवाढ न देता ती बंद करण्यात आली का, असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांच्यासह भाजप सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद केल्याचे म्हणता येणार नाही.शिवाय, जलयुक्त शिवार योजनेचे नाव बदलून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे करण्याचे कोणतेच निर्देश सरकारने दिले नसल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २०१५ ते २०१९ या काळात २२ हजार ५८६ गावे निवडण्यात आली होती. या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत एकूण ६ लाख ३२ हजार ७०८ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ९ हजार ७०७ कोटींचा निधी खर्च झाल्याचे जलसंधारण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्टपणे नमूद केले.योजना नव्हे, हे तर अभियानजलयुक्त शिवार ही योजना नसून एक अभियान आहे. अभियानाची मुदत संपल्यानंतरही जी कामे अपूर्ण असतील ती कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण केली जातील. मात्र नव्याने कोणतेही काम हाती घेतले जाणार नाही, असे गडाख यांनी यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस