शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:54 IST

जयंत पाटील समर्थक गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. सांगलीत पाटील समर्थकांनी पडळकरांविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. 

सांगली - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत सापडले आहे. सर्वच स्तरातून पडळकरांच्या विधानाचा निषेध होत असून भाजपानेही त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानाची गंभीर दखल घेत आमदार पडळकरांना फोन करून समज दिली आहे. 

याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता. अशाप्रकारची वक्तव्ये करू नका अशी सूचना मला मुख्यमंत्र्‍यांनी दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन असं पडळकरांनी सांगितले आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर बोलले, एआयचा वापर करून व्हिडिओ तयार केला तेव्हाही पवारांनी मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला होता का? हे कुठे माध्यमांत असेल तर दाखवा. जयंत पाटील यांची माफी कशासाठी मागायची? असा उलटा प्रश्नही त्यांनी पत्रकारांना केला. 

तर मी या विषयावर काही बोलणार नाही असं विधान जयंत पाटील यांनी केले आहे. मात्र जयंत पाटील समर्थक गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. सांगलीत पाटील समर्थकांनी पडळकरांविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते योग्य नाही. कुणाच्याही वडिलांबाबत अथवा कुटुंबाबद्दल विधान करणे योग्य नाही. याबाबत गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललो आहे. त्यांना समज दिली आहे. या विषयावर शरद पवारांचाही मला फोन आला होता. मी त्यांनाही आम्ही अशा विधानांचे कधीच समर्थन करणार नाही असं सांगितले. गोपीचंद पडळकर हे तरूण आणि आक्रमक नेते आहेत. आक्रमकता दाखवताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवूनच आक्रमकता ठेवली पाहिजे. तुम्हाला आयुष्यात चांगला नेता म्हणून संधी आहे. परंतु आपल्या बोलण्यामुळे काय अर्थ निघतील याची काळजी घ्यावी असा सल्ला मी पडळकरांना दिला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी टोचले कान

दरम्यान, वादग्रस्त विधानांसंदर्भात महायुतीचे धोरण ठरलेले आहे. भाजपच्या संदर्भातील जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. ते यावर बोलतील. गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं, याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण, मी याच विचाराचा आहे की, कोणी कोणत्याही राजकीय विचारांचा असो...आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. एक संस्कृती आहे असं अजित पवारांनी म्हटलं होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा