शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:50 IST

CM Devendra Fadnavis PC News: निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis PC News: माळेगाव नगरपंचायतीत आमच्या विचारांचे १८ उमेदवार निवडून द्या. मी सांगितलेले सगळे करीन; पण, तुम्ही जर 'काट' मारली, तर मीही 'काट' मारणार. तुमच्या हातात मताचा अधिकार आहे, तर माझ्या हातात निधीचा अधिकार आहे, आता बघा काय करायचं ते, असा थेट आणि सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी एवढेच सांगतो की, संपूर्ण राज्याचा विकास आम्हाला करायचा आहे. सर्व भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. अनेकवेळा भाषणात काही गोष्टी आपण बोलतो. त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. आमचे सहकारी किंवा कोणी असे बोलले असले, तरी त्यांचा उद्देश तसा नाही. तेही असा भेदभाव कधी करणार नाहीत. निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला जनता निवडून देईल. त्यानंतर महाराष्ट्राचा, नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

न बोलण्यासारखे काही घडलेले नाही

एकनाथ शिंदे यांच्याशी निर्माण झालेल्या दुराव्याच्या दाव्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, हा वेड्यांचा बाजार सुरू आहे. यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत. परवा जेव्हा मी आणि एकनाथ शिंदे हुतात्मा स्मारकावर गेलो, तेव्हा आल्यावर आणि जाताना आम्ही भेटलो. ते कुठे जात आहेत, हे त्यांनी सांगितले आणि मी कुठे जात आहे, हे त्यांना  सांगितले. त्यातून काही गोष्टी क्लिक करून बोललो नाही, असे दाखवले गेले. कालच्याही कार्यक्रमात आमच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याचे ठरले होते. तिथे आल्यावर, स्टेजवर आणि जातानाही आम्ही भेटलो. कारण न बोलण्यासारखे काहीही घडलेले नाही. तुम्ही दाखवत आहात, तशी कुठलीही परिस्थिती नाही. जे लोक असे दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, मी काय साधू-संत नाही. तुम्ही मतदान करा, कामे मी करून देईन. मागचे गेले ते गंगेत गेले. ही नवी पहाट आहे. माझ्याकडे १४०० कोटींचे बजेट आहे. त्यातला तुमचा हिस्सा मी नक्की आणून देईन. देश-राज्यात युती असताना माळेगावमध्ये झालेली स्थानिक युती ही विकासासाठीच आहे. आमच्या युतीत कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. बारामतीत हजारो कोटींचा निधी आणला, तसेच येथेही करणार. अर्थखाते माझ्याकडे आहे. वाढपी तुमच्यासमोर आहे. ओळखीचा वाढपी अधिक वाढतोच, असे अजित पवार म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis clarifies Ajit Pawar's statement on funds; denies discord with Shinde.

Web Summary : Fadnavis defended Pawar's remarks about fund allocation, assuring equitable development. He refuted claims of a rift with Shinde, dismissing media speculation and emphasizing continued collaboration for Maharashtra's progress.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMahayutiमहायुती